शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणातून शहराची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:14 IST

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आउटसोर्सिंगने साफ सफाई करण्यास विरोध होत असतानाही महापालिकेच्या वतीने आता निविदा मागविण्यात आल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आउटसोर्सिंगने साफ सफाई करण्यास विरोध होत असतानाही महापालिकेच्या वतीने आता निविदा मागविण्यात आल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.  महापालिकेत सफाई कामगारांची संख्या सतराशे असून, त्यातील दोनशे ते तीनशे कामगार कामाच्या सोयीने अन्यत्र काम करीत असतात. त्यामुळे वाढत्या शहराला सफाई कामगारांची संख्या कमी पडते. महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सुमारे साडेचार हजार सफाई कामगारांची आवश्यकता आहे; परंतु यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर भरतीस परवानगी न देताच आउटसोर्सिंगने काम करण्याच्या सूचना केल्या जातात. महापालिकेने यापूर्वी कालिदास कलामंदिर तसेच रुग्णालयांच्या स्वच्छतेचे खासगीकरण केले आहे; मात्र आता शहर स्वच्छतेचे कामही खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेतला असून, मंगळवारी (दि. २३) यासंदर्भात निविदा मागविल्या आहेत. गेल्यावर्षी महापालिकेने अशाप्रकारचा प्रस्ताव तयार केला होता; मात्र सफाई कामगारांच्या संघटनांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाने हा प्रस्ताव बाजूला ठेवला होता. चालूवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता आणि तो गुपचूप मंजूरही झाला आहे. आता त्याची कार्यवाही करीत महापालिकेने निविदा मागविल्या असून, त्यानुसार शहरातील स्वच्छतेचे काम खासगीकरणातून केले जाणार आहे.पुन्हा वाद पेटण्याची शक्यता महपालिकेच्या वतीने यापूर्वी कुंभमेळ्या वेळी खासगीकरणातून स्वच्छतेचे काम करून घेण्यात आले होते. या कामाच्या ठेक्यावरून बरीच भवतीन् भवती झाली होती. आता त्याचा पुढील टप्पा सुरू होत असून, शहराच्या काही भागात खासगीकरणातून स्वच्छतेची कामे केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेत या विषयावरून आता वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महापालिकेकडे सफाई कामगारांची संख्या अल्प असून, ते सफाई कामगार संघटनेलादेखील मान्य आहे. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेने सफाई कामगारांची भरती करावी, अशी त्यांची मागणी आहे. सफाई कामगार म्हणून परंपरेने काम करणाऱ्या वर्गालाच भरतीत सामावून घ्यावे, अशी कर्मचारी संघटनांची मागणी असून, त्यामुळेच महापालिकेत हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान