शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम सक्तीची  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 14:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधून मधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते, एका दिवसापुरता मर्यादित असलेली या स्वच्छता मोहिमेतुन कचरा गोळा करण्यापेक्षा प्रसिद्धीची हौसच संबंधितांकडून भागवून घेतली जात

ठळक मुद्देगैरहजर कर्मचा-यांना नोटीसा : महसूल खात्यात रोषगैरहजर असलेल्या कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस

नाशिक : २ आॅक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेंतर्गंत आयोजीत केलेली स्वच्छता मोहीम नागरिकांना सक्तीची की ऐच्छिक असल्याचा वादाचा मुद्दा पुढे आला आहे. स्वच्छता मोहीम सक्तीचीच असेल तर मग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमण्याची गरज नाही, अधिकारी कर्मचा-यांनी दररोज येऊनच स्वच्छता केली पाहिजे अशी संतप्त भावनाही कर्मचारी व्यक्त करीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधून मधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते, एका दिवसापुरता मर्यादित असलेली या स्वच्छता मोहिमेतुन कचरा गोळा करण्यापेक्षा प्रसिद्धीची हौसच संबंधितांकडून भागवून घेतली जात असल्याचे आजवरच्या मोहिमेंतून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वच्छता मोहिम राबविण्याचे ठरविले व तसे पत्र प्रत्येक खातेप्रमुखांना पाठवून त्यांना त्यांच्या पातळीवर कार्यालयाची स्वच्छता तसेच आवारात स्वच्छतेच्या सुचना करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर काहींना या कार्यबाहुल्यामुळे या कार्याकडे पाठ फिरविल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या माहितीतुन उघड झाली. खुद्द जिल्हाधिकारी हातात झाडू घेत कचरा काढत असताना काही अधिकारी व कर्मचा-यांनी स्वच्छतेची बाब गांभीर्याने न घेतल्याचे कारण पुढे करून दोन महिन्यानंतर स्वच्छता मोहिमेस गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत. स्वच्छता मोहिमेस गैरहजर असण्यामागचे कारण या नोटीसीद्वारे विचारण्यात आले असून, त्याचे योग्य लेखी कारण समोर न आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची धमकीही देण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक