शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:21 IST

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  नेहमीच समाजाचे भान ठेवत सामाजिक उपक्रम राबविणाºया नाशिक सायकलिस्टच्या या उपक्र मात दहा लहान मुलांसह सुमारे १५० सभासद सहभागी झाले होते.  यावेळी कळसूबाई शिखर चढाईच्या संपूर्ण मार्गावर पर्यावरण व स्वच्छतेचे संदेश देणाºया १५ कचराकुंड्या लावण्यात आल्या. त्यावर विशेष असे संदेश असलेले फलक लावण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छतेबाबत सर्वांनी शपथ घेतली. परिसर स्वच्छ राहावा, यासाठी वारंवार विविध ठिकाणी अशा मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नाशिक सायकलिस्टचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात आली.  नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस आणि डॉ. मनीषा रौंदळ यांनी संपूर्ण मोहिमेचे अचूक नियोजन केले. योगेश शिंदे आणि त्यांच्या टीमने चढाई मार्गावर फलक लावण्यासाठी मेहनत घेतली. फलक लावण्यासाठी स्वामी समर्थ माध्यमिक व महाविद्यालय राजूर (अकोले) यांच्या हिवाळी शिबिरानिमित्त आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक भोर यांनी विशेष परिश्रम घेतले. ट्रेकर सुरेंद्र शेळके यांनी २३ तारखेला रात्री शिखरावर मुक्काम करत सायकलिस्ट्स सदस्यांकडून राहिलेला कचरा गोळा करत पुण्याला रवाना झाले.  हरीश बैजल सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते. जळगावचे अनिल सोनवणे हे रात्रभर प्रवास करत या खास मोहिमेत सहभागी झाले. शिखरावरील मंदिराजवळ त्यांच्या चाळीस लोकांच्या टीमने साफसफाई केली. राजूरचे शांताराम काळे यांनी गावातील पंधरा मुलांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. एस्पालिअर शाळेचे सचिन जोशी यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या. गोळा केलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठविला शनिवारी सकाळी ५ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून १५० जणांच्या टीमने कळसूबाई शिखराकडे प्रस्थान केले. शिखरावर पोहचल्यानंतर सर्वांनी मिळून एकूण ५० गोणी कचरा गोळा केला. गोळा केलेला कचरा एका ट्रकमध्ये भरून तो पुनर्वापर करण्यासाठी नाशिकला पाठविण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक