कळवण पोलिस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:52 PM2020-10-02T22:52:57+5:302020-10-03T00:51:41+5:30

कळवण : सेवा सप्ताहाची सांगता व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कळवण तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कळवण पोलिस स्टेशन परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Cleaning operation in Kalvan Police Thane area | कळवण पोलिस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम

कळवण येथे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा सन्मान करतांना डॉ. अनिल महाजन. समवेत दीपक खैरनार, निंबा पगार चेतन निकम, हितेंद्र पगार आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देआर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे व मास्कचे वाटप

कळवण : सेवा सप्ताहाची सांगता व महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कळवण तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कळवण पोलिस स्टेशन परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी भाजपा तालुका संघटन सरचिटणीस डॉ.अनिल महाजन यांनी मनोगत व्यक्त करु न अभिवादन केले. कोविड काळात कर्तव्य बजावणारे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम व पोलीस कर्मचारी यांना हितेंद्र पगार, चेतन निकम व भाजपा कार्यकर्त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याचवेळी आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे व मास्कचे वाटप करण्यात आले. प्लास्टिक बंदी, ई वेस्ट कलेक्शन आणि ई वेस्ट प्रोसेसिंग, रिसायकल या संदर्भात कळवण शहरातील मेन रोड परिसरातील नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, गोविंद कोठावदे, अमित देवरे, हेमंत पगार, आशुतोष आहेर, मनोहर बोरसे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Cleaning operation in Kalvan Police Thane area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.