शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:16 IST

गेल्या वर्षापासून देशभरात ग्रामीण भागात स्वच्छता कायम राहण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून २५ ते ३० गावांची पडताळणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून करण्यात येते.

ठळक मुद्देकार्यशाळा : नागरिकांकडून आॅनलाइन प्रतिक्रिया घेणारग्रामीण भागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष प्रतिक्रिया नोंदविली जाईल

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ बुधवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत करण्यात येऊन या सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छतेचे काम हे पुण्याचे काम असून, स्वच्छता ठेवली तरच तेथे लक्ष्मी नांदते ही आपली संस्कृती व परंपरा आहे. प्रत्येक गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या सर्वांची असून प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांगळे यांनी यावेळी केले.

गेल्या वर्षापासून देशभरात ग्रामीण भागात स्वच्छता कायम राहण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून २५ ते ३० गावांची पडताळणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून करण्यात येते. यात प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, आठवडी बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविली जाईल. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत प्रत्येक गावातील सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी ७ ते ८ गावांमध्ये सामान्य नागरिक तसेच सामूहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. त्यासाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीही शेवटच्या सत्रात कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून माहिती घेतली. यावेळी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, जि. प. सदस्य भास्कर गावित, बाळासाहेब क्षीरसागर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, समाजकल्याण अधिकारी मंगेश वानखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद