शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्गमैत्रिणी पसार : शाळकरी मुली बेपत्ता होण्याच्या घटना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:01 IST

शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामागील काही कारणे ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक असल्याचे अद्याप पुढे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे

ठळक मुद्देशाळकरी मुली बेपत्ता होण्याची बाब चिंताजनकतरुणी राहत्या घरांमधून निघून जात असल्याने भीती

नाशिक : गंगापूररोडवरील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या व एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकणाºया दोन अल्पवयीन वर्गमैत्रिणी अचानकपणे परिसरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याने भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या आढळून आल्या नसल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.काही दिवसांपुर्वीच शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिडको भागातील अशाच काही मुली बेपत्ता झाल्या होत्या; मात्र पोलिसांनी अल्पवेळेतच त्यांचा शोध घेत नातेवाईकांच्या हवाली केले होते. शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्यामागील काही कारणे ही वैयक्तिक किंवा कौटुंबिक असल्याचे अद्याप पुढे येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र अल्पवयीन शाळकरी मुली बेपत्ता होण्याची बाब चिंताजनकदेखील आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तरुणी राहत्या घरांमधून कोणालाही काहीही न सांगता निघून जात असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांपुढे हे नवे आव्हान उभे राहिले आहे. तसेच शाळांच्या शिक्षकांपुढेदेखील आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन वर्ग किंवा कार्यशाळा शाळांमध्ये राबविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.शिवाजीनगरमधील शेजारी-शेजारी राहणा-या दोन कुटुंबातील मुली अशाच पध्दतीने कोणाला काहीही माहिती न देता पसार झाल्या आहेत. या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी (दि.७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले आणि सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या एका १५वर्षीय शाळकरी मुलीच्या आईने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलींचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांनी शहर व परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.

टॅग्स :Schoolशाळाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयKidnappingअपहरण