शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:22 IST

बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसात वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यमंडळाच्या सुचनांनुसार संबिधत महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागाला मिळाल्या बारावीच्या गुणपत्रिका विभागीय कार्यालयात गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू

  नाशिक : बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसात वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यमंडळाच्या सुचनांनुसार संबिधत महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीता करण्याच्या सुचना  विभागीय मंडळाकजून करण्यात येणार आहेत.बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये असेलली संभ्रमावस्था आता संपुष्टात आली असून येत्या आठवड्याच्या पूर्वार्धातच विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विभागीय मंडळाच्या कार्यालयात कार्यवाही सुरू आहे. नाशिक विभागातून ८९ हजार २५ मुले व ६७ हजार ६६४ मुले असे एकूण १ लाख ५६ हजार ७८९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षे प्रविष्ट झाले होते. त्यौपकी असे एकूण १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ७० हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक  महानगरपालिका क्षेत्रातील ५९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १० हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. संपूर्ण विभागातील नाशिक, धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये तथा उच्च माध्यमिक विद्यालयांना गुणपत्रिकाचे गठ्ठे तयार करण्याचे काम विभागीय कार्यालयात सुरू आहे. राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या गुणपत्रिकांची पडताळणी करून त्यां संबधित महाविद्यालयांची स्वतंत्र पाकिटे तयार करून त्यात भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही पाकिटे महाविद्यालयांना सुपुर्द करण्यात येणार आहे, त्यानंतर महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने गुणपत्रिकांचे वाटप करण्याच्या सुचना करण्यात येणार असून गुणपत्रिकांचे वितरण करताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय मंडळाचे सचीव नितीन उपासणी यांनी दिली आहे.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय