शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वनारवाडी प्राथमिक शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:16 IST

लखमापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वनारवाडी येथील शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध आॅनलाईन व आॅफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्र मांतर्गत शिक्षकांनी आॅनलाईन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, गल्ली मित्र व प्रत्यक्ष संवाद साधून पालक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने घरोघर फिरून अध्यापन करीत आहेत.

ठळक मुद्देलखमापूर : शाळा बंद, शिक्षण सुरु अंतर्गत उपक्रम

खंडेराव मंदिर परिसरातील सभामंडपात भरलेल्या वर्गाला भेट देऊन मार्गदर्शन करतांना सरपंच दत्तात्रय भेरे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्कर घोलप. समवेत वर्गशिक्षक सुनंदा अहिरे, विलास जमदाडे व विद्यार्थी.

 

लखमापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वनारवाडी येथील शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध आॅनलाईन व आॅफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्र मांतर्गत शिक्षकांनी आॅनलाईन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, गल्ली मित्र व प्रत्यक्ष संवाद साधून पालक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने घरोघर फिरून अध्यापन करीत आहेत.गावातील खंडेराव मंदिर परिसरात सोशल डिस्टन्स ठेवून भरविण्यात आलेल्या वर्गास उपसरपंच दत्तात्रय भेरे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्कर घोलप यांनी भेट घेऊन समाधान व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, मोहाडी बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप व केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनारवाडी येथे शारीरीक अंतर ठेवून तसेच मास्क वापरु न विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे. तसेच शिक्षक घरोघर फिरून दिक्षा अ‍ॅप व टेलिग्रामवरील तंत्रसेतू- नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. खंडेराव मंदिर परिसरात पालकांच्या संमतीने उपस्थित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणींचे निरसन व अभ्यास कसा करावा हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात येत आहे. भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप व सुनंदा अहिरे आदी शिक्षकांनी शाळा स्तरावर नियोजन करून आठवड्यातून किमान दोन दिवस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केलेले आहे. त्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नसल्याने शाळेच्या या उपक्र माचे परिसरातील पालक वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी