शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

पालिकेचा ७० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा

By admin | Updated: February 26, 2015 23:54 IST

घरपट्टीचा प्रश्न : सर्वेक्षण न करणाऱ्या स्पेक सिस्टीमविरुद्ध कारवाई

नाशिक : शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण अर्धवट सोडलेल्या मे. स्पेक सिस्टीम या हैदराबादच्या कंपनीच्या विरोधात महापालिकेने कठोर पावले उचलत तब्बल ७० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. महापालिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात दावा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.नाशिक शहरात दर तीन वर्षांनी मिळकतींचे सर्वेक्षण करून त्यानुसार घरपट्टी आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे खासगी कंपनीमार्फत शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवून स्पेक सिस्टीम या हैदराबादच्या कंपनीला काम दिले होते. या संस्थेला १५ नोव्हेंबर २००५ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यानुसार या कंपनीने मिळकतींचा सर्वे करणे, तसेच मिळकतींना क्रमांक देणे ही सर्व माहिती एका विशिष्ट संगणकीय प्रणालीत साठविणे आणि महत्त्वाचे म्हणजेच जीआयएस लिकिंग करणे ही जबाबदारी देण्यात आली होती. सदरच्या कंपनीने नाशिक पश्चिम, सिडको आणि सातपूर या तीन विभागांचे काम सुरू केले; परंतु अर्धवटच ठेवले. त्यामुळे २००९ पर्यंत वेळोवेळी या कंपनीला कामासाठी मुदतवाढ देण्यात आली. किमान अर्धवट केलेले कामकाज पूर्ण करावे, अशी सूचना करण्यात आली. तरीही संबंधित कंपनी काम करू शकली नाही. २९ डिसेंबर २०१२ रोजी सदरच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढील कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला.महापालिकेने संबंधित ठेकेदारास आयुक्तांमार्फत नोटीस पाठविली. त्यानंतर संबंधित कंपनीने काम पूर्ण करण्याची तयारी दर्शविली असली, तरी पालिकेचे अगोदरच या कंपनीमुळे वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींना, तसेच घरपट्टी लागूच नसलेल्या मिळकतींना कर आकारणी करता आली नाही, त्यामुळे २०१३ पर्यंत ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि तेही भरपाई मिळावी, यासाठी महापालिकेने आपले वकील वि. वि. पारख यांच्यामार्फत संबंधित कंपनीस नोटीस पाठविली आणि आता हीच रक्कम वाढून ७० कोटी रुपयांच्या रकमेच्या वसुलीसाठी दावा करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयात या प्रकरणी दावा दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)