शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

शहर बस तोट्यात की नफ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:32 AM

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देविभाग नियंत्रकांची परस्परविरोधी भूमिकापरिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य

नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्याने शहर बस वाहतुकीचा तोटा कोटीवरून लाखावर आल्याचे लेखी मान्य केल्यामुळे ही बससेवा तोट्यात की नफ्यात, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाºया शहर बससेवेच्या फेºया गेल्या वर्षी तोट्याचे कारण दाखवून बंद करण्याचे प्रकार परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे शहरातील प्रवाशांची वाहतूक करणारी बससेवा अचानक तोट्यात कशी गेली, असा सवाल त्यावेळी करण्यात येऊन बंद केलेल्या प्रवासी फेºया सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली. बस फेºयांच्या कपातीमुळे नोकरदार, शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करून ती नाशिक महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला व त्यामागे दरमहा होणाºया आर्थिक तोट्याचे कारण दिले आहे.नाशिक महापालिकादेखील शहर बससेवा चालविण्यास उताविळ झाल्याने त्यांनी या संदर्भातील व्यवहार्यता तपासण्यासाठी पैसे खर्च करून तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. असे असताना सदरची बससेवा परिवहनशहर बस तोट्यात की नफ्यात?(पान १ वरून)महामंडळानेच चालवावी यासाठी नाशिकचे उदय कुलकर्णी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून विनंती केली व बससेवा बंद केल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली होती. यावर न्यायालयानेही या पत्राची दखल घेत परिवहन महामंडळ व महापालिकेला याबाबत विचारणा केली असता, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत शहर बससेवेतून दरवर्षी होणारा आर्थिक तोटा कमी झाल्याचे म्हटले आहे.या संदर्भात विभाग नियंत्रकांनी तोट्याचा महिनानिहाय तक्ता जोडला असून, त्यात एप्रिल २०१७ मध्ये ३ कोटी ८२ लाख रुपये तोटा होता तो आता चक्क फक्त २३ लाखांवर आल्याची आकडेवारी दिली आहे. शहरी फेºयांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण करण्यात आल्यामुळे तोटा कमी झाल्याचे मान्य केले आहे. फेºया तात्पुरत्या स्थगित शहर बस वाहतूक तोट्यात चालत असल्यामुळेच शहरांतर्गत फेºयांमध्ये कपात करणाºया परिवहन महामंडळाने एकीकडे तोट्यात कपात झाल्याचे सांगतानाच कपात केलेल्या फेºया या काही काळासाठीच स्थगित करण्यात आल्याचे व नंतर त्या पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले आहे. या संदर्भात उदय कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात विभाग नियंत्रकांनी म्हटले आहे की, प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीत शालेय मार्गावरील नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेत त्या फेºया पुनश्च सुरू करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फेºया कमी केल्याने तोटा कमी झाला असे मान्य केले तर दुसरीकडे त्या फेºया पुन्हा सुरू करण्यात येऊनही तोट्यात कमालीची घट होत असल्याचे स्पष्ट झाल्याने परिवहन महामंडळाच्या या परस्पर विरोधी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.