शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यास शहर पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:21 IST

एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पोलिसांसाठी घातक ठरत असून, राज्यात बाधित पोलिसांची संख्या एक हजार ९६४वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे मालेगावी बंदोबस्त पार पाडत असताना सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १२ पोलिसांनी कडवी झुंज देत कोरोनावर मात केली. दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस दलाने अद्याप कोरोनाला थोपवून धरले असून, हे शुभ वर्तमान मानले जात आहे. शहर पोलिसांनी शहरात पहारा देताना स्वत:ची अधिकाधिक खबरदारी घेत कोरोनाचे संक्रमण अद्याप टाळले आहे.

ठळक मुद्देस्वयंशिस्तीचे काटेकोर पालन : १४४ ग्रामीण पोलिसांची कोरोनावर मात

अजहर शेख। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा पोलिसांसाठी घातक ठरत असून, राज्यात बाधित पोलिसांची संख्या एक हजार ९६४वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे मालेगावी बंदोबस्त पार पाडत असताना सुमारे दीडशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी १२ पोलिसांनी कडवी झुंज देत कोरोनावर मात केली. दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस दलाने अद्याप कोरोनाला थोपवून धरले असून, हे शुभ वर्तमान मानले जात आहे. शहर पोलिसांनी शहरात पहारा देताना स्वत:ची अधिकाधिक खबरदारी घेत कोरोनाचे संक्रमण अद्याप टाळले आहे.कोरोनाचा फटका राज्यातील पोलीस दलासही बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील तीन कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला. मात्र शहर पोलिसांनी घेतलेली खबरदारी आणि नियोजनामुळे शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे अद्याप तरी कोरोनापासून सुरक्षित राहिले आहे.शहर पोलिसांनीही कोरोनाचा धोका ओळखून सुरुवातीपासूनच चोख नियोजन केले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरुवातीपासूनच ५० वर्षांवरील पोलिसांना गर्दीच्या ठिकाणांपासून बंदोबस्तासाठी दूर ठेवले. नियंत्रण कक्षातून वेळोवेळी दूरध्वनीद्वारे अधिकारी संपर्क साधत ५०पेक्षा अधिक वयाच्या कर्मचारी वर्गाची तब्येतबाबत विचारपूस करत आढावा घेत होते. आठ तास सेवा बजावल्यास पोलिसांचे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून राहण्यास मदत होते ही बाब ओळखून प्रत्येक कर्मचाऱ्यास नांगरे पाटील यांनी ८ तास बंदोबस्त कसा वाट्याला येईल याचे चोखपणे नियोजन केले. कर्तव्यावरील पोलिसांना सतत गरम पाणी मिळावे यासाठी सर्वांना थर्मा फ्लॅक्स देण्यात आले.नुकेतच शहर पलिीस कर्मचाऱ्यांना स्मार्ट घड्याळे देण्यात आली आहेत. यातून शरीराचे तापमान, रक्तदाब आदी बाबींची नोंद होते. सर्व्हरद्वारे ही माहिती पोलीस मुख्यालयास पुरविली जात आहे, अशा एक ना अनेक प्रयोगांमुळे शहर पोलीस अद्याप कोरोनापासून सुरक्षित राहिले असून, यापुढेही राहतील असा आशावाद मुख्यालयाच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी व्यक्त केला आहे....म्हणून रोखता आला कोरोनाचा शिरकावशहरातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्याबाहेर सॅनिटायझेशन कक्ष उभारले गेले. आरोग्य यंत्रणेच्या पथकासोबत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना कोरोनाचा रुग्ण शोधत असताना तसेच पीपीई किटदेखील पुरविले गेले. पोलिसांची वेळोवेळी आरोग्य तपासणी, फिरती मोबाइल सॅनिटायझेशन व्हॅन, रोगप्रतिकारशक्ती वाढविणाºया गोळ्या-औषधांचा पुरवठा, सॅनिटायझर, हातमोजे, मास्कची मुबलक उपलब्धता, प्रत्येक पोलिसाला स्वत:च्या काळजीच्या विशेष सूचना अशा विविध स्तरावर करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या