शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड शहराला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 00:35 IST

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.

ठळक मुद्देउन्हाळा होणार सुसह्य : पालखेड धरणाचे दोन आवर्तन शिल्लक

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाड पुरते हैराण झाले होते. चांगला पाऊस न झाल्यामुळे धरण भरले जात नव्हते. त्यामुळे पंधरा, पंचवीस तर एकावर्षी पंचावन्न दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती होती. पाऊस पाहिजे तसा झाला नाही. मात्र, शहराला आवर्तन देणाऱ्या धरणसमूहात चांगला पाऊस झाल्याने आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ओव्हर फ्लो झाले होते. तर बाकी असलेले पालखेड धरणाचे आवर्तनही उचलण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या घडीला धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.शहराला एकवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी चार दशलक्ष घनफूट पाणी लागते. यावर्षी मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण भटकत पायपीट करावी लागली नाही की पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. पाणीपुरवठ्याचे दिवसदेखील कमी करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांच्या पाणीटंचाईवेळी होणारी पाणीटंचाई यंदा जाणवली नाही.इन्फोवागदर्डीत ७० दलघक्ष पाणीसाठाशहरात रेल्वे इंजिन कारखाना, खाद्य निगमचे गोडाऊन, जंक्शन स्थानक आणि शीख बांधवांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गुरुद्वारामुळे देशभरात मनमाड शहर प्रसिद्ध असून, दुष्काळग्रस्त तालुका आणि पाणीटंचाईचे गाव म्हणून मनमाड शहराची ओळखदेखील आहे. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे धरणात मुबलक पाणी असल्याने मनमाडकर समाधानी आहेत. सध्या पाटोदा येथील साठवण तलावात १०.५ फूट अर्थात १० दशलक्ष घनफूट पाणी, तर वागदर्डी धरणात ६५.५ फूट अर्थात ७० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि चार महिने अर्थात मार्चपर्यंत पुरेल तर त्यानंतर जानेवारी आणि एप्रिल या महिन्यात शहरासाठी राखीव असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि मिळणारे आवर्तन यामुळे उन्हाळा पार होऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट सध्या तरी नाही.- डॉ. विजयकुमार मुंढे, मुख्याधिकारी.(२७ मनमाड वॉटर १, विजय मुंढे)शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात असलेला पाणीसाठा.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी