कळवण : आषाढी एकादशीचा पवित्र सण कळवण शहर व तालुक्यात विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रती पंढरपूर गणल्या जाणार्या विठ्ठल मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. बाल गोपाळानी वारकर्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याची पायी पालखी व दिंडीने कळवणकरांचे लक्ष वेधून घेत विठूनामाच्या गजराने कळवण शहर दुमदुमून गेले होते कळवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या ऐताहासिक प्रतीपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे? वाजेपासून विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्तांनी गर्दी केल्याने व मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याने मंदिर परिसरात सुरक्षारक्षक नेमण्याची वेळ श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर आली ,प्रती पंढरपूर समजल्या जाणार्या या ऐताहासिक श्री विठोबा महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे 4 वाजता श्री विठोबा महाराज देवस्थान तर्फे कौतिक पगार,भूषण पगार परिवाराने महापूजा केली ,त्यानंतर आरती होवून विठुरायाच्या दर्शनासाठी येणार्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला साबुदाण्याची खिचडी हा महाप्रसाद वाटण्यात आला ,आषाढी एकादशी निमित्ताने मंदिर परिसर सजविण्यात येवून मंदिरापुढील जागेत दर्शनासाठी येणार्या विठ्ठल भक्तांची गर्दी लक्षात घेवून मंडप उभारला होता , श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी व विश्वस्त यांच्याकडून मंडपात श्री विठ्ठल भक्तांचे होणारे स्वागत लक्ष वेधून घेणारे होते ,पहाटे ? वाजेपासून रात्रीपर्यंत विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी एकच गर्दी मंदिरात केली होती त्यात अबालवृद्ध ,महिला ,बाल गोपाळ,युवक यांची संख्या लक्षणीय होती जिल्ह्याच्या विविध भागातून दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या ,श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे ,उपाध्यक्ष सुधाकर पगार ,सरचिटणीस जयंत देवघरे ,विश्वस्त परशुराम पगार ,कौतिक पगार ,कृष्णा पगार ,अशोक जाधव मोतीराम पगार ,हरिश्चंद्र पगार आदी पदाधिकारीनी दिंडीतील विठ्ठल भक्तांचे व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत केले पावसातही सकाळी ,दुपारी व सायंकाळी विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्याने गर्दी झाली होती ,दर्शनाची आस असणार्या विठ्ठल भक्तांनी शिस्तीचे दर्शन घडविल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा झाला ,आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागातून लाखो विठ्ठलभक्त विठूरायापुढे नतमस्तक झाले असल्याची माहिती श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे ,उपाध्यक्ष सुधाकर पगार यांनी सांगितले, सकाळी जानकाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पायी दिंडी कळवण शहरातून काढली होती हातात टाळमृदुंग ,घेत डोक्यावर पांढरीटोपी, कुडता ,धोतर तसेच वेशभूषेतील विद्यार्थी कळवणकरांचे लक्ष वेधून घेत होते ,कळवण तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडला नव्हता मात्र आषाडीच्या पुर्वसंधेपासून पावसाने चांगली हजेरी लावली.(वार्ताहर)
विठूनामाच्या गजराने दुमदुमले कळवण शहर
By admin | Updated: July 28, 2015 00:41 IST