शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:25 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाचा सोहळा रविवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.

नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाचा सोहळा रविवारी (दि. २७) अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. सकाळी नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर अभ्यंग स्नान करून सायंकाळी अश्विन वद्य अमावस्येच्या मुहूर्तावर घरोघरी नागरिकांनी सुख-समृद्धीची मनोकामना करीत लक्ष्मीचे मनोभावे पूजन केले. छोटे-मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दुकानामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. यानिमित्त अबालवृद्धांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू दिल्या.यंदा नरक चतुर्दश्ी आणि लक्ष्मीपूजन हे दिवाळी पर्वातील दोन सण एकाच दिवशी आल्याने रविवारी सकाळी पहाटे घरोघरी अश्विन शुद्ध चतुर्दशी या दिवश्ी अंगाला तेल-उटणे लावून अभ्यंग स्नान केले.बाजारपेठ गजबजलीलक्ष्मीपूजन सणानिमित्त रविवारी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत फुले-फळे, पूजेचे साहित्य, कपडे व नवीन वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे मेनरोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोड आदी भागातील बाजारपेठ दिवसभर गजबजली होती. आठवडाभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाने रविवारी उघडीप दिल्याने नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून. परंतु पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने फुलांचे दर घसरले. दसरा सणाला सुमारे १०० ते १२० रुपये किलो दराने मिळणारे फुले रविवारी ४० ते ५० रुपये किलोने विकली जात होती. सायंकाळी तर फुलांचे दर आणखी कोसळले. ४० ते ५० रुपये कॅरेट या दराने फुले मिळत होती.पाडवा, वहीपूजनाचा मुहूर्तसोमवारी (दि. २८) अमावस्येला पूजनासाठी सकाळी ६.३६ ते ८.०१ वाजेपर्यंत अमृत मुहूर्त असून, त्यानंतर सकाळी ९.२७ ते १०.५३ पर्यंत लाभ मुहूर्तदेखील आहे. त्याचप्रमाणे व्यापारीबांधवांकरिता वही पूजनासाठी सकाळी ९.२७ ते १०.५३ पर्यंत शुभ मुहूर्त आहे.मनोभावे लक्ष्मीपूजनलक्ष्मीपूजनासाठी दुपारी १.४५ ते ३.११ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त होता तर सायंकाळी ६.०२ ते ७.३७ पर्यंत शुभ मुहूर्त आणि रात्री ७.३७ ते ते ९.११ वाजेपर्यंत अमृत मुहूर्तावर लक्ष्मीपूजन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.चौरंगावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर आदी देवदेवतांच्या मूर्ती व प्रतिमा ठेवून मनोभावे पूजन करण्यात आले. तसेच दागिने, पैसे (कोºया नोटा) धनधान्य यांचेही पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी व अन्य देवदेवतांना मिष्ठान्न, फराळाचे पदार्थ, लाह्या, बत्तासे, धने, गुळ आदिंचा नैवेद्य दाखवून आरती म्हणण्यात आली. त्याचप्रमाणे घरात, नोकरी-व्यवसायात सुखसमृद्धी लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, लक्ष्मीपूजनानंतर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

टॅग्स :DiwaliदिवाळीReligious programmeधार्मिक कार्यक्रम