शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूल येथे कडी-कोयंडा तोडून सत्तर हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:11 IST

नगरसूल येथे वडचामळा परिसरात चोरांनी घरीफोडी करून सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून नगरसूल परिसरात चोरट्याचा धूमाकूळ वाढला असून, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

येवला : नगरसूल येथे वडचामळा परिसरात चोरांनी घरीफोडी करून सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून नगरसूल परिसरात चोरट्याचा धूमाकूळ वाढला असून, पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.  नगरसूल येथील कुडके, बोरसे वस्तीवर चोरट्यांनी अनेक ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात वडचामळा परिसरात ईक्बाल शेख यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ईक्बाल शेख, त्यांच्या पत्नी, मुलगी, दोन मुले घरात झोपलेले असताना रात्री १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दाराचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. शेख कुटुंबीयांना माहिती न लागता घराची संपूर्ण झडती घेत पेटीत ठेवलेले रोख दहा हजार रु पये, ईक्बाल यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून चोरट्यांनी पळ काढला. पत्नीच्या ओरडण्याने शेख कुटुंब जागे झाले. शेख यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. गुन्हा दाखल करून वेगाने तपासाची चक्रे फिरवली. मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नरेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. सुरासे करत आहेत.  दोन दिवसांपासून नगरसूल परिसरातील विविध भागात चोरट्यांनी चोरीचे प्रयत्न केले असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असले तरी पोलिसांत कुठलाही गुन्हा दाखल नाही. पोलिसांची गस्त वाढविण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा