शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावकरांना शहरबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:23 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत नियंत्रित असले तरी मालेगावमधून स्थलांतरितांमुळे नाशिक शहरात धोका वाढू नये यासाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत नियंत्रित असले तरी मालेगावमधून स्थलांतरितांमुळे नाशिक शहरात धोका वाढू नये यासाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने पोलिसांना तातडीने पत्र पाठविले असून, मालेगावकडून येणारी मुंबई-आग्रा रोडवरील सीमा सील करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आडगाव येथे सीमा सील करण्यात आली आहे, तर अन्य दोन ठिकाणी महापालिकेची पथके तपासणी करीत आहेत.गेल्या महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर सुरुवातील निफाड पाठोपाठ नाशिक शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. मात्र, त्यानंतर महापालिकेने अगोदरच केलेले नियोजन अत्यंत कडकपणे अमलात आणले. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी, बाधितांच्या घराच्या परिसरातील नागरिकांची तपासणी पाचशे मीटर ते तीन किलोमीटर एरिया सील करणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे शहरात आता दहा बाधित रुग्ण आढळले असले तरी मूळ शहरातील रुग्ण तीनच आहेत. बाकी अनेक जण स्थलांतरित किंवा अन्य शहरांतून आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे आढळले आहे. गेल्या दहा दिवसांत तर मूळ नाशिक शहरात एकही रुग्ण आढळला नसताना बाहेरून आलेल्यांमुळेच नाशिक शहराची डोकेदुखी वाढत आहे. मालेगाव हे शहरापासून जवळ असल्याने उपचार आणि आश्रयासाठी अनेक मार्गाने नागरिक शहरात दाखल होऊ लागल्याची चर्चा आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी यांसदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देतानाच पोलीस दलाला सीमा सील करताना शिथिलता बाळगली जात असेल तर शहर आणि जिल्ह्याच्या सीमेवर सीआरपीएफ जवान तैनात करण्याची मागणीच केली आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने पोलीस आयुक्तालयाला पत्र देऊन मालेगावकडून येणारा मुंबई-आग्रा महामार्ग सील करण्याची मागणीच केली आहे. त्यानुसार आडगाव येथे पोलिसांनी सीमा सील केली आहे. याशिवाय औरंगाबाद आणि दिंडोरी मार्गावरून येणा-या स्थलांतरितांवर करडी नजर ठेवली जात आहे. महापालिकेच्या वतीनेदेखील शहराच्या हद्दीलगत पाहणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक