शहरं
Join us  
Trending Stories
1
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
2
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
3
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
4
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
5
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
6
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
7
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
9
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
10
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
11
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
12
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
13
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
14
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
15
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
16
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
17
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
18
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
19
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
20
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवेला ‘ब्रेक’ ठरलेलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:12 IST

शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला हळूहळू ‘ब्रेक’ लावण्यास सुरुवात केलीच आहे

नाशिक : शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला हळूहळू ‘ब्रेक’ लावण्यास सुरुवात केलीच आहे. नवनियुक्त विभाग नियंत्रकही त्याच धोरणात्मक निर्णयावर ठाम असून, बसफेºयांमध्ये टप्प्याटप्प्याने कपात यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.इंधन खर्च, दुरुस्ती खर्च, कामगारांना कि.मी.प्रमाणे दिले जाणारे वेतन अशा सर्वच बाजूंनी विचार करता शहराची बससेवा तोट्यात आहे. यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून बससेवा बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने बसफेºयांची कपात करावीच लागणार असल्याचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी स्पष्ट केले. पाच दिवसांपूर्वीच मैंद यांनी नाशिक परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकपदाची सूत्रे हाती घेतली असून, त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मैंद यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.  शहर बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार असून, त्याबाबत महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महापालिकेने लवकरात लवकर बससेवा चालविण्याबाबतचा निर्णय घ्यावा यासाठी पुन्हा पत्र देणार आहे. बसफेºया कमी करणे महामंडळाला भाग आहे, कारण महामंडळाला बससेवा बंद करावयाची आहे. आर्थिकदृष्ट्या शहर बससेवेची चाके तोट्यात फिरत असल्यामुळे महामंडळाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.  एकूणच महामंडळ आणि महापालिका या दोन संस्थांच्या प्रशासकीय कारभार आणि धोरणात्मक निर्णयांमुळे सर्वसामान्य नाशिककरांचा जीव टांगणीला लागला आहे. नाशिक कर ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचे अपुºया बससेवेमुळे हाल होत आहेत. आगामी काळात शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागताच पुन्हा बसफेºया अधिक कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  शहराच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत भूमिका घेऊन बससेवेविषयी ठोस तोडगा काढण्याची मागणीहोत आहे....म्हणे प्रवाशांच्या सेवेसाठीराज्य परिवहन महामंडळाकडून नाशिककरांवर सध्या अन्याय होत आहे. महामंडळाने तोट्याचे कारण पुढे करून शहर बससेवा थांबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे अधिकारी सांगतात. महापालिके कडे बससेवा हस्तांतरित करण्यात येणार असून, बससेवा यापुढे पालिका प्रशासनाने चालवावी, असा महामंडळाचा अट्टाहास आहे. मात्र, अद्याप पालिका प्रशासनाने तशी तयारी दर्शविली नसून हालचालीदेखील केलेल्या नसताना केवळ अट्टाहासापोटी महामंडळाकडून शहर बससेवेच्या फेºया कमी केल्या जात आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात सुरू असून, २५० बसफेºयांवरून त्या केवळ १२० वर आल्या आहेत. यामुळे विद्यार्थिवर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिलांचे हाल होत आहेत. बहुतांश भागातून बसेसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागते. शहराच्या विविध भागांमधील मार्गांवर बसेसची संख्या अत्यल्प झाल्यामुळे बससेवा म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महामंडळाकाडून बसफेºयांमध्ये केली जाणारी कपात अलीकडे अधिक वाढण्याची चिन्हे आहेत, कारण शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर बसफेºयांमध्ये अधिक कपात करण्याची संधी महामंडळाच्या नाशिक विभागाला मिळणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी