शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

शहर बससेवा ; सर्वाधिकार आयुक्तांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:32 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस वाहतुकीचा तयार केलेला प्रस्ताव पूर्णत: प्रशासनाच्या बाजूचा असून, केवळ बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेकडे आहे. त्यानंतरची संपूर्ण कार्यवाही इतकेच नव्हे तर भाडे ठरविण्यापासून सर्वच अधिकार आयुक्तांना आहेत.

ठळक मुद्देभाडे ठरविणे, कंत्राटदाराचे मूल्यमापन प्रशासनच करणार

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस वाहतुकीचा तयार केलेला प्रस्ताव पूर्णत: प्रशासनाच्या बाजूचा असून, केवळ बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेकडे आहे. त्यानंतरची संपूर्ण कार्यवाही इतकेच नव्हे तर भाडे ठरविण्यापासून सर्वच अधिकार आयुक्तांना आहेत. दरवर्षी ठेकेदाराच्या बससेवेचे मूल्यमापन करण्याचे अधिकार हे प्रशासनातील अधिकाऱ्यांची समिती करणार आहे. त्यामुळे आधीच परिवहन समितीची तरतूद नसल्याने हिरमुसलेल्या नगरसेवकांना आता हादेखील धक्का सहन करावा लागणार आहे.महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक चालविण्याचा प्रस्ताव आयुक्ततुकाराम मुंढे यांनी महासभेत सादर केला असून, येत्या बुधवारी (दि. १९) त्यावर निर्णय होणार आहे. बससेवा का आवश्यक आहे आणि ती कशी चालवावी याबाबत आयुक्तांनी प्रस्तावात स्पष्टीकरण दिले असून, त्यासंदर्भात नगरसेवक सध्या अभ्यास करीत आहेत; परंतु त्यातील अनेक गोष्टी लोकप्रतिनिधींना खटकत आहेत. विशेषत: परिवहन समिती नसल्याने नगरसेवकांची नाराजी आहे. त्यात आता अन्य तरतुदींची भर पडत आहे.महापालिकेच्या शहर बस वाहतुकीसाठी महापालिकेने ठरविलेले भाडे ठेकेदाराला आकारणे बंधनकारक आहे.मात्र, दुसरीकडे इंधन दरवाढ आणि महागाईच्या तुलनेत भाडेवाढ करणे आवश्यक असल्याने त्यासंदर्भातील अधिकारही आयुक्तांकडे असणार आहेत. महाराष्टÑ महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३४३ नुसार भाडे ठरविण्याचे अधिकार हे परिवहन समिती व महापलिकेच्या सर्वसाधारण सभा यांच्याऐवजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे इंधन दरवाढीच्या व महागाईच्या तुलनेत प्रमाणात भाडेवाढ करणे आवश्यक असल्याने नियमित भाढेवाढ करण्याचे अधिकार आयुक्त यांच्याकडे राहतील असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेच्या वतीने देण्यात येणाºया कंत्राटाचा कालावधी १० वर्षांसाठी असेल व त्यानंतर तो दोन वर्षांकरिता वाढविण्यात येणार आहे; परंतु प्रत्येक वर्षानंतर कंत्राटदाराचे बस चालविण्याचे मूल्यांकन करण्यात येईल त्यासाठी अधिकाºयांची समिती गठित करण्यात येईल व कंत्राटदाराने काम असमाधानकारक केले असल्यास पुढील कालावधीकरिता कंत्राट सुरू ठेवणे किंवा रद्द करणे याबाबत उपक्रमाचा निर्णय कंत्राटदारावर बंधनकारक असेल असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सेवेत नगरसेवकांना कोणताही अधिकार नसल्याने नियंत्रण कसे राहणार? असा प्रश्न नगरसेवक उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालकtukaram mundheतुकाराम मुंढे