शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहर व परिसरात दिवसभर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:46 IST

शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कायम होता. दिवसभरात १५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मागील ३२ तासांत शहरात ३९ मि.मी.पर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता.

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कायम होता. दिवसभरात १५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मागील ३२ तासांत शहरात ३९ मि.मी.पर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता.शहर व परिसरात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या सरींचा संततधार वर्षावाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. घाटक्षेत्रांमधील परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी व सोमवारी जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या तालुक्यांत मुसळधार तर शहरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार शहरात दिवसभर हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होत होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.६ मि.मी. इतका पाऊस पडला. तसेच शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मि.मी.पर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरीक्षण केंद्राकडून देण्यात आली.सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होता, मात्र सकाळी ८.३० वाजेपासून पावसाचा जोर वाढला. मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होऊ लागल्याने तीन तासांत ७.४ मि.मी. पाऊस झाला. दिवसभरात हा ‘स्पेल’ वगळता पावसाचे प्रमाण कमी राहिले. ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पावसाने जवळपास उघडीप दिली होती. या कालावधीत शहरात केवळ २.६ मि.मी. पाऊस झाला. दुपारनंतर पुन्हा जोर वाढल्याने सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५.६ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.गंगापूर धरण ७२ टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात ३०६ मि.मी.गंगापूर धरणाचा जलसाठा ७२ टक्क्यांवर शनिवारी सायंकाळी पोहोचला होता. जलपातळी ४ हजार ५४ दलघफूपर्यंत वाढली असून, ३४५ दलघफूपर्यंत नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. पाणलोट क्षेत्रात जोर‘धार’ सुरू राहिल्याने साठ्यात वाढ झाली. त्र्यंबकमध्ये सर्वाधिक ११२, तर अंबोलीत ६१ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीgangapur damगंगापूर धरण