शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
4
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
5
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
6
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
9
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
10
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
11
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
12
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
13
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
14
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
15
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
16
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
17
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
18
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
19
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
20
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

सराईत गुन्हेगारांमध्ये वचक; शहरातील ८ गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:52 PM

शहरात शांतता राहावी, सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहर पोलीस सराइत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगार, त्यांचे समर्थकांना सामाजिक भान ठेवून त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नाशिक : शहरातील  उपनगर, नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी टोळी तयार करुन गंभीर गुन्हे करणाऱ्या ८ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होईल व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल असलेल्या मयुर चमन बेद (३१) याच्यासह संजय उर्फ मॉडेल चमन बेद (३३) व रोहित उर्फ माथ्या उर्फ बंटी गोविंद महाले उर्फ डिंगम (२३, रा. फर्नांडिसवाडी, उपनगर) या तिघांना तडीपार केले आहे. तसेच नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवाज उर्फ बाबा बब्बु शेख याच्या टोळीतील अक्षय बाळू धुमाळ (२३, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड), मोसिन युसुफ पठाण (२६, रा. सादिक नगर, वडाळागाव) आणि शुभम ज्ञानेश्वर सुर्यवंशी (२०, रा. देवळालीगाव) या तिघांनाही तडीपार केले आहे. तर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबीन तन्वीर कादरी (रा. उपेंद्रनगर) या टोळीप्रमुखासह त्याचा साथीदार गौरव उमेश पाटील (रा. साईबाबानगर, सिडको) या दोघांनाही शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. शहरात शांतता राहावी, सण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी शहर पोलीस सराइत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगार, त्यांचे समर्थकांना सामाजिक भान ठेवून त्यांच्या वर्तवणूकीत सुधारणा करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनीही गुन्हेगारांविषयी माहिती दिल्यास गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल व तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्याचे आश्वासन पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी दिले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक