शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २१.७ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:18 IST

शहर व परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २१.७ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३०) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला.

नाशिक : शहर व परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात २१.७ मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३०) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला.सोमवारपासून शहरात वाऱ्याचा वेगही वाढला असून, सोसाट्याच्या वाºयासह सरी कोसळत असल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नाशिककरांना काहीशी हुडहुडीदेखील जाणवू लागली आहे. गेल्या गुरुवारपासून शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली असून, गुरुवारी १५.४ मिमीपर्यंत पाऊस पडला होता.सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत १५.८ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. जून महिन्यात पावसाची स्थिती समाधानकारक नव्हती, मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दमदार‘कम बॅक’ केले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. पावसाची संततधार सुरु असली तरी जनजीवन मात्र सुरळीत सुरु होते. कुठेही पावासाचा व्यत्य आला नाही.गंगापूरची साठवण क्षमता साडेपाच टीएमसीगंगापूर धरणाची ५ हजार ६४० दशलक्ष घनफूट अर्थात साडेपाच टीएमसी इतकी साठवण क्षमता आहे. धरणाचा जलसाठा सध्या ४ हजार ७५८ दशलक्ष घनफूट इतका झाला असून, ८४.७८ टक्के धरण भरले आहे. गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक