शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:06 IST

ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळल्यात येण्याच्या प्रकारांवरून दिसते आहे.

ठळक मुद्दे.ग्रामीण भागात परिस्थिती भयावह आहे.

ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळल्यात येण्याच्या प्रकारांवरून दिसते आहे.जानेवारीत संपूर्ण देशात कोरोनाने आक्रमण केले, तर जूनमध्ये बाधितांची संख्या प्रमाणापेक्षा वाढली. मध्यंतरी सरकारने लॉकडाऊन जाहीर करून देश शांत केला. त्यावेळी काही अंशत: बाजार सोडला तर सगळंच बंद होतं. माणसाला त्याच्या नेमक्या मूलभूत गरजा घरात बसून समजल्या. त्यावेळी तर जे चंचल स्वभावाचे होते त्यांनी स्वाभाविक दंडुकेदेखील खाल्ले, तर अनेकांवर छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले. पोलिसांवरचा ताण हा सामान्य माणसाला बघवत नव्हता. एकट्या ओझर पोलीस ठाण्याच्या भागाचा विचार केला तर पाच हजार लोकांमध्ये एक पोलीस असा आकडा होता. त्यामुळे हा सगळीकडे स्वयंशिस्त लावण्याचा प्रकार होता, परंतु सर्वत्र लोकांनी केवळ घाबरून घरात राहणे पसंत केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.मात्र, सरकारने अनलॉक फेज सुरू केल्यानंतर नाशिकसह ग्रामीण भागात दररोजची वाढणारी आकडेवारी चिंतेचा विषय ठरू पाहतेय. जी भीती लोकांना लॉकडाऊन असताना कमी आकडेवारीत होती ती आता पाचपटीने आकडे वाढूनदेखील राहिलेली नसल्याचे नागरिकांच्या निर्धास्त वागणुकीवरून दिसू लागले आहे.ग्रामीण भागात परिस्थिती भयावह आहे. फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता नागरिकांमधील कोरोनाची भीती पळाली आहे. आज अनेक ठिकाणी पोलीस पकडतील म्हणून मास्क जवळ ठेवतात, मात्र पोलीस किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची पाठ फिरतात नागरिक पुन्हा मास्क खिशात ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य