शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची कामे तातडीने करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:55 IST

मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देआयुक्तांचा दौरा : नोंदणीचे काम एकाच ठिकाणी द्यावे

नाशिकरोड : मनपा घेऊन देण्यात येणाऱ्या दाखल्यासाठी सर्वसामान्यांना पैसे व वेळ खर्च करावे लागतात. याकरिता जन्म-मृत्यूच्या नोंदणीकरिता एकाच व्यक्तीकडे नोंदणीचे काम देण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय व इतर ठिकाणी गमे यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी सकाळी नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात भेट देऊन एक खिडकी विभाग, कर भरणा केंद्र, ई-सुविधा केंद्र, जन्म-मृत्यू विभाग, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आदी कार्यालयांची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. अधिकारी-कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बिटको रूग्णालयाची नूतन इमारत, अग्निशामक केंद्र इमारतीची पाहणी करून माहिती घेतली.जेलरोड के. एन. केला शाळेशेजारील मनपाच्या भाजीबाजाराच्या मोकळ्या पाहणी करतांना त्या ठिकाणी एका राजकीय पदाधिकाऱ्याचा फलक दिसल्याने गमे यांनी आचारसंहिता सुरू असतानाही फलक कसा काय राहिला याबाबत तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली. आता हे फलक आयुक्तांनीच काढायचे का? असा सवाल करत मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर व अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम यांना खडे बोल सुनावले. जेलरोड पंचक येथील मनपाच्या रुग्णालयात भेट देऊन गमे यांनी नाराजी व्यक्त केली. दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ मध्ये गमे यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत मनपा शाळेचा दर्जा वाढवावा, असे आवाहन गमे यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता एस.एम. चव्हाणके, संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता सी.बी. आहेर, देवेंद्र माळी, रोहिदास बहिरम, आरोग्याधिकारी सतीश हिरे, वैद्यकीय अधीक्षक गायकवाड आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.विवाह नोंदणीसाठी प्रतिज्ञापत्राची गरज नाहीविवाह नोंदणीसाठी संबंधित व्यक्तिकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची गरज नसल्याचे शासनाच्या परिपत्रकानुसार गमे यांनी स्पष्ट केले. संबंधिताचे स्वाक्षरी केलेले पत्र स्वीकारावे त्यामुळे वेळ वाचेल असे गमे यांनी स्पष्ट केले. याशिवाय पंचक येथील मनपाच्या रूग्णालयाची पाहणी करतानाइ-औषधाचे वाटप होत नसल्याचे दिसून आल्याने मनपातील सर्वच फार्मसिस्टचे जोपर्यंत ई-औषधे वाटप सुरू होत नाही तोपर्यंत वेतन रोखण्याचे आदेश गमे यांनी दिले. आचारसंहितेच्या काळात जेलरोड येथे राजकीय फलक आढळून आल्याने गमे यांनी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना त्वरित स्वत: जाऊन त्या फलकाचा फोटो काढून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे