शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 07:48 IST

नाशिक शहरालगतच्या वडनेर दुमाला परिसरात धास्तीने बदलले जीवन;

संजय पाठकनाशिक : संपूर्ण घर पिंजऱ्यात बंद, मात्र, बिबट्या मोकाट! कधीही येतो, कधीही जातो, कुणाला झाडावर दिसतो, कुणाला रस्त्यावर. एकटे दुकटे फिरण्याची सोय नाही. सायंकाळी ६ वाजेच्या आत लहानमोठे सारेच जण घरात. पाण्याची बारी सोडायला जाणे धोकादायक. मुलांना सकाळी स्कूल व्हॅनपर्यंत सोडणे म्हणजे जिवाचा धाक. बिबट्या आलाय, तो इथं दिसलाय, तिथून जात आहे, माहितीसाठी व्हॉट्सॲपवर मेसेज आला की थरकाप! नाशिक महापालिका हद्दीतील सीमारेषेवर असलेल्या वडनेर दुमाला गावाची ही स्थिती तिथले भय दर्शवणारी आहे.

८ ऑगस्ट २०२५. रात्री ८ वाजेची वेळ. भगत मळ्यातील घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या आयुषला बिबट्याने उचलले. गावाचा थरकाप उडाला. गावकरी एका हातात लाठ्याकाठ्या कोयते व दुसऱ्या हातात बॅटऱ्या घेऊन बिबट्याला मारायला निघाले. वनखात्याने पिंजरे लावले. आतापर्यंत तीन बिबटे जेरबंद झाले. परंतु हा विषय येथेच संपलेला नाही. परिसरातील ऊस, मका शेती, आर्टिलरी परिसरातील जंगल, गावाजवळील नाला यामुळे बिबट्याला पोषक वातावरण असल्याने किमान पाच ते सहा बिबट्यांचा येथे मुक्त संचार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर नागरिकांनी त्यातल्या त्यात स्वसंरक्षणासाठी जे काय करता येईल ते केेले आहे. त्यांची जीवनशैलीच यामुळे बदलली. घरांना आणि शेतीला लोखंडी तारांचे कुंपण, सीसीटीव्ही, व्हॉट्सॲप ग्रुप आणि फिरताना, बॅटरी, काठ्या आणि कोयते ग्रामस्थांना आवश्यक ठरले आहे. वनखाते म्हणते बिबट्यासोबत जगायला शिका; पण ज्या माणसांनी स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घेतलं, आपलं लेकरू बिबट्या केव्हाही उचलून नेईल या भीतीने जगणे मुश्कील झाले, त्या माणसांचं काय? 

कोणी माणूस बाहेर गेला की, रात्री परतेपर्यंत भीती वाटते

भगत कुटुंबीयांनी घराला लोखंडी जाळ्यांचा पिंजरा करून घेतला आहे. मुलांनी त्याच्या बाहेर जायचंच नाही, तिथेच  खेळायचे, मुलांचे बालपणच बंदिस्त झालंय, असे सांगताना आयुषच्या आई रेखा भगत यांना गलबलून आले. बिबट्या  अजूनही शेतात येतो, घराच्या छतावर नाचतोे, त्यामुळे साऱ्यांना घाम फुटतो असे त्यांनी सांगितले. घरातील कोणी पुरुष बाहेर गेला की, रात्री परत येण्याची भीती वाटते, तो आलाच तर आधी फोन करतो मगच जाळीचा दरवाजा उघडतो, असे त्या म्हणाल्या. शाळेत जाण्यासाठी मुलांना व्हॅन आहे; परंतु वडनेर शिवरोडवर मुलांना नेण्याची भीती वाटते, असे पूजा भगत यांनी सांगितले. घरासमोर शेती, पण कामाला जाता येत नाही. पाणी सोडण्यासाठी आता मोबाइलचा वापर सुरू केला; परंतु बारी द्यायला जावेच लागते. भुईमूग काढणीसाठी मजूर आले तर तीन-चार जणांना काठ्या घेऊन त्यांचे संरक्षण करावे लागले, असे चंद्रकला भगत व अनिता भगत यांनी सांगितले.

दोन-पाच जण लाठ्याकाठ्या घेऊन असतील तरच काम करायला तयार 

उसाचा मळा, त्या बाजूला कांदे लावलेले; पण काम करायला मजूर मिळत नाही. शेतात मजूर खाली वाकून काम करतात, त्यामुळे बिबट्याच्या टप्प्यात असतात. मजूर आता २-५ जण लाठ्याकाठ्या घेऊन असतील तरच काम करायला तयार होतात, असे याच गावातील बाजीराव पोरजे यांनी सांगितले. 

दोन दिवसांपूर्वी मुलगा लघुशंकेला गेला तर समोर बिबट्या उभा...

जाधव मळ्यातील धोंडिराम जाधव यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी छोटा मुलगा लघुशंकेला गेला तर समोर बिबट्या उभा. आम्ही बॅटरीचा प्रकाश टाकल्यानंतर तो पळाला. शुक्रवारी (दि. २१) पहाटे बिबट्याच्या पावलांचे शेतात उमटलेले ठसे त्यांनी दाखवले. मध्यरात्री भाजीपाला विकण्यासाठी पिकअप घेऊन जायचे म्हटले तरी दोघे तिघे एकदम निघतात. पंधरा  दिवसांपूर्वी मध्यरात्री यार्डात निघालो तेव्हा मोटारी समेारून कुत्रा चालला असे वाटले; पण बिबट्या होता. गाडीचे लाइट त्यावर टाकल्यावर पळाला. आधीच मळे भाग, पथदीप नाही, लाइट गेलेच तर लाइनमन येण्यास घाबरतो, त्याच्या बरोबर तीन-चार लोक लाठ्याकाठ्या घेऊन असले की तो काम करण्यास तयार होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Humans Caged, Leopard Roams Free: Fear Grips Nashik Village

Web Summary : Vadner Dumala villagers live in fear due to frequent leopard sightings. Protective measures like caged homes, CCTV, and group alerts define their lives. Farming and daily routines are severely impacted, raising questions about human-wildlife coexistence.
टॅग्स :leopardबिबट्या