शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कळवण शहरातील रस्ते कामात दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:14 PM

कळवण शहरातील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी रस्ता कामांची पाहणी करून ठेकेदाराच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

ठळक मुद्देनाराजीचा सूर : आमदार नितीन पवार यांनी केली पाहणी; कामे दर्जात्मक पूर्ण करण्याची सूचना

कळवण : शहरातील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी रस्ता कामांची पाहणी करून ठेकेदाराच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हायब्रीड अन्यूइटीअंतर्गत होणाऱ्या दरेगावपासून नांदुरी ते कळवण - पिळकोस या कळवण तालुका हद्दीतील रस्त्याच्या कामाची आमदार नितीन पवार यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत पहाणी केली. सर्वाधिक रहदारींच्या या रस्त्यावरील चढउतार, पूल, मोरी आदी अनुषंगिक कामांचा समावेश करून रस्ता कामात सुधारणा करणे  अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर कळवण  शहरातील रस्त्याच्या कामात  सुधारणा करावी, रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे  दुकानदार व व्यावसायिक यांचे नुकसान होते. त्यामुळे कामे दर्जात्मक व युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली.  दरेगाव ते नांदुरी चढउताराच्या रस्त्याची सुधारणा करावी, आवश्यक तेथे रस्ते सरळ व सुरक्षित करावे, आठंबे येथे पुलाची उंची व रुंदी वाढवावी अशी  मागणी नांदुरी, दरेगाव, गोबापूर, आठंबे  येथील ग्रामस्थांनी आमदारांकडे पाहणी दौऱ्यात केली. याशिवाय, नवी बेज, भादवण, पिळकोस येथील नागरिक व शेतकऱ्यांनी निवेदन देऊन रस्ते कामात नवीन कामांचा समावेश करण्याची मागणी केली. नामपूर - कळवण  ते वणी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्वतंत्र यंत्रणा या रस्त्यावर कार्यान्वित असताना एकही अधिकारी व कर्मचारी या कामावर आढळून येत नसल्याने ठेकेदार व मजूर यंत्रणा यांच्या भरवशावर रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू  असल्याची तक्रार नागरिकांनी आमदारांकडे केली.  वणी-नांदुरी ते कळवण हा ठिकठिकाणी वळण व चढउताराचा रस्ता आहे. तेथे वळण सरळ करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष झाले असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMLAआमदार