शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:11 IST

प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

इंदिरानगर : प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.  गेल्या एक वर्षापासून प्रभाग ३० मध्ये पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दहा दिवसांपासून पांडवनगरी, कलानगर, श्रद्धाविहार कॉलनी, शिव कॉलनी, रॉयल गार्डन, एकता कॉलनी, सार्थनगर यांसह परिसरात ऐन पावसाळ्यात आणि गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही परिसरातील महिला वर्गास पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.नगरसेवक बडोदे यांनी रविवारी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चव्हाण यांना भेटून त्यांना परिसरातील पाणीपुरवठा नियोजनाअभावी नेहमीच अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. यावेळी महिला आणि नागरिकांनी चव्हाण यांना घेराव घातला.  महापालिकेचे सर्व कर भरूनसुद्धा आम्हाला नेहमीच कृत्रिम पाणीटंचाई सामोरे जावे लागते यांसह विविध प्रश्न करीत धारेवर धरले होत. पाणीपुरवठा होत असलेल्या पाथर्डी फाटा येथील जलकुंभाची जलसाठ्याची पाहणी सुद्धा केली. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरेश न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराचे निवेदन त्यांना देण्यात आले निवेदनावर सुमारे पन्नास नागरिकांच्या स्वाक्षरी आहे. इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीही अनेकवेळा केली आहे.गेल्या वर्षभरात अनेकदा निवेदनेहोळीच्या दिवशी नगरसेवकांसह सुमारे दीडशे महिलांनी राजे छत्रपती चौकात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाºयांनी दिले होते. तरीही परिस्थिती ‘जैसे थेच’ आहे. पावसाच्या गढूळ पाण्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे जलकुंभ भरले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी