शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोथिंबीर ७० रुपये जुडी ; नाशकात पालेभाज्या तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:48 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7)  सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७०  रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली.बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतील पालेभाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली आहे.

ठळक मुद्देपालेभाज्यांना निसर्ग चक्रीवादळाता फटका शेतमालाचे नूकसान झाल्याने आवक घटली कोरोना आणि चक्रीवादळामुळे पालेभाज्या तेजीत

नाशिक :  नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत पालेभाज्या व्यापाऱ्यांना कोरोना लागण झाल्याने येथील व्यावहारांवर आलेले निर्बंधासोबतच याच काळात  पालेभाज्यांना मागणी वाढल्याने पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजारपेठेत रविवारी (दि.7)  सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रति जुडीला ७०  रुपये तर त्या पाठोपाठ मेथी ४० आणि कांदापात ३० रुपये जुडी या दराने विक्री झाली अशी माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली. बाजार समितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतील पालेभाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणचे आठवडे बाजार बंद केले आहेत. तर भाजीपाला विक्री करणाऱ्यांना जागा व वेळ ठरवून दिलेली आहे. त्यातच ग्राहकही हातगाडीवर भाजीपाला खरेदीसाठी टाळाटाळ करीत असल्याने आहेत. ग्राहकांकडून रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्री करणाऱ्यांकडे गर्दी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बाजार समिती आवारात पालेभाज्या विक्रीसाठी आणण्यापेक्षा थेट रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना भाजी विकण्याचा पयार्य निवडला आहे. त्यामुळे बाजार समिती आवारात दररोज होणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे. दरम्यान, बाजारसमितीतून  मुंबई व मुंबई उपनगरात रोज भाजीपाला माल रवाना केला जात असल्याने मागणी वाढली असताना आवक घटल्याने पालेभाज्या तेजीत आल्या आहेत. त्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वत्र पाऊस झाला असून परिणामी शेतातील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक घटल्यामुळेही बाजारभाव तेजीत आलेले आहेत. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिकMarketबाजारvegetableभाज्याCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ