शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सिडको भागात नागरी वस्तीत कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:02 IST

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देनागरिकांचे आरोग्य धोक्यातमनपाच्या कारभाराबाबत नाराजी

नाशिक/सिडको: महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरातील तसेच व्यावसायिक व भाजीबाजारातील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारामार्र्फत घंटागाडीची व्यवस्था केली आहे. परंतु सिडको भागात मनपा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. रिमझिम पावसामुळे या कचºयाच्या ढिगाºयात पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांना रस्त्याने जाताना त्रास होत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनपाच्या कर्तव्यदक्ष आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याची अपेक्षा सिडकोवासीयांनी व्यक्त केली आहे.गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आरोग्य विभागाच्या कामचुकारपणामुळे येथील मुख्य चौक तसेच भाजीबाजार परिसरात कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी साफसफाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरीवस्तीतही ठिकठिकाणी घाण साचलेली दिसून येत असून यामुळे सिडको भागात साथीचे रोग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. यातच डासांचे प्रमाणही वाढले असताना संबंधित विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या डेंग्यूसदृश, चिकुनगुण्या आजारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असताना आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व घंटागाडी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. मंगळवारी जुने सिडको भागातील भाजीबाजार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलला नसल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक कल्पना पांडे व माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे यांना कळविले. पांडे यांनी तत्काळ कचरा असलेल्या भागात जाऊन पाहणी करीत संबंधित मनपा कर्मचाºयांना जाब विचारला. अधिकाºयांनी तत्काळ घंटागाडी बोलावून साचलेला कचरा उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :NashikनाशिकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न