शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत भरदिवसा युवकावर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 01:22 IST

रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात रविवारी भरदिवसा तरुणावर पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिडको : रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात रविवारी भरदिवसा तरुणावर पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सिडकोतील रायगड चौकातील शिवनेरी उद्यान परिसरात मोहन देवकर (१८, रा. रायगड चौक, सिडको ) हा तरुण रविवारी उद्यान परिसरातून जात असताना समोरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पूर्व वैमनस्यातून कुरापत काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, टोळक्यातील एका तरुणाने जवळील कोयत्याने मोहनवर वार केले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले असून, पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा शोध घेतला जात आहे. टोळक्यातील बहुतांश मुले अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गेल्या काही महिन्यांपासून सिडको परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा रविवारी दुपारी पाहायला मिळाला. एका युवकावर भर दिवसा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडल्यामुळे सिडको परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी