नाशिक : सिडको, अंबड परिसरात शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध संस्था, मित्र मंडळांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन राजांना मानाचा मुजरा करण्यात आला.जुने सिडको, राणाप्रताप चौक, विजयनगर, सावतानगर, पवननगर, त्रिमुर्ती चौक, शिवशक्ती चौकासह आदि परिसरात शिवजयंतीचा अपुर्व उत्साह पहावयास मिळत आहे. संपुर्ण सिडको परिसर शिवरायांच्या पोवाड्यांनी दुमदुमला असून शिवभक्तीमध्ये तरुणाई मग्न असल्याचे चित्र आहे. चौकाचौकात भगवे ध्वज, पताका लावून सजावट करण्यात आली आहे. चौकाचौकात छत्रपतींना अभिवादन करण्यात येत आहे. संध्याकाळी उत्तमनगर येथून मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे. उत्तमनगरपासून तर थेट त्रिमुर्ती चौकापर्यंत शिवजयंतीची वाजत गाजत थाटात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सिडकोत शिवजयंतीचा उत्साह : संध्याकाळी मिरवणूक
By admin | Updated: March 15, 2017 15:45 IST