शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:39 IST

सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून, गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.

सिडको : सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून, गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही सिडको प्रभागावर प्रभाग सभापती होण्याचा मान हा सेनेच्याच उमेदवाराला मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.सिडको प्रभाग सभापतिपदासाठी मागील वर्षीप्रमाणेच यंदाही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या दोन वर्षांत ज्यांना सेनेकडून विविध पदे देण्यात आली आहे अशांना डावलून इतर इच्छुकांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. येत्या शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता प्रभाग सभापतिपदाची निवडणूक होणार आहे.सिडको प्रभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८, २९ व ३१चा समावेश करण्यात आला आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेच्या कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव आदींचा समावेश आहे. यंदा शिवसेना व भाजपाची युती झाली असून, भाजपाच्या नगरसेवकांमध्ये भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, नितीन ठाकरे, छाया देवांग, भगवान दोंदे, संगीता आव्हाड आदींचा, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना १४, भाजपा नऊ व राष्टÑवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (चौदा) पाठोपाठ भाजपा (नऊ) दुसºया क्रमांकाचा पक्ष असून, सेना व भाजपाची युती झाल्याने विरोधकांमध्ये राजेंद्र महाले हे एकमेव नगरसेवक उरले आहे. सेनेचे नगरसेवक दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, महिला नगरसेवक किरण गामणे (दराडे), कल्पना चुंभळे आदींनी सभापतिपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. एकूणच सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे.असे आहे पक्षीय बलाबलसिडको प्रभागात सहा प्रभाग मिळून २४ नगरसेवक आहेत. शिवसेना व भाजपाची युती झाली असून, २४ पैकी सेना-१४ व भाजपा-०९ असे युतीचे २३ नगरसेवक आहेत. विरोधी गटामध्ये राष्ट्रवादीचे एकमेव राजेंद्र महाले हे नगरसेवक आहे.४सेनेने पहिल्या वर्षी सभापती म्हणून डेमसे यांना, तर दुसºया वर्षी हर्षा बडगुजर यांना सभापतिपद दिले असून, यंदा कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक