सिडकोतील औदुंबर चौकात काही भागात नळाला पाणी येत नव्हते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे कडे तक्रार केली. परंतु सुरुवातीला त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परंतु पुन्हा पुन्हा तक्रारी आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने दखल घेतली आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व पहाणी केली. यावेळी सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत आहे, तर फक्त एका रो-हाऊसकडे पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे मनपा अधिकारी यांनी संबंधित लोकांना स्व खर्चाने तुमच्या घराकडे जाणारी जलवाहिनी तपासून घेण्यास सांगितले. नागरिकांनी स्वखर्चाने प्लंबर बोलावून खोदकाम केले व जलवाहिनी तपासली असता त्यात मृत उंदिर आढळला. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट..
सिडकोतील बहुतांश पाण्याचे व्हॉल्व्ह चेंबर्सवर झाकण नसल्याने कचरा व उंदिर आढळतत .मनपाने सिडको भागातील जलवाहिनी नियमित स्वच्छ करण्याची गरज आहे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.