शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

सिडकोला मंगळसुत्र अन् मुंबईनाक्यावर कारफोडून लॅपटॉप लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 14:13 IST

शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही.

ठळक मुद्देदोन दुचाकी चोरट्यांनी केल्या गायबमंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून आलेले चोरटे फरार गंगापूररोड, बोरगड येथून दोन दुचाकी गायब

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. बडदेनगरच्या रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असलेली पोत हिसकावून दुचाकीवरून आलेले चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिता संजय देसले (४७, रा. लेखानगर, सिडको) या बडदेनगर रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी येथील एका रुग्णालयासमोर त्यांच्या समोरील बाजूने दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ७१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरांविरुद्ध जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक शिंदे करीत आहेत.मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटलेच्या वाहनतळात उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रफुल्ल अरूण पाटील (३८,रा. गणेशदर्शन सोसा. पाथर्डीफाटा) यांनी मुंबईनाका पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. पाटील हे मुंबईनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता त्यांची स्वीफ्ट मोटार (एम.एच.१९ बीजे ५८३०) त्यांनी वाहनतळात उभी केली. चोरट्यांनी दरवाजाची काच फोडून ३० हजार रूपये किंमतीचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप लांबविला.

दोन दुचाकी चोरट्यांनी केल्या गायब

नाशिक  शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. अज्ञाच चोरट्यांनी गंगापूररोड, बोरगड येथून दोन दुचाकी गायब केल्या. तसेच इंदिरानगरला पुन्हा एका युवकाच्या हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावल्याचा प्रकार घडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या वाहनतळात हेमंत अनिल बोकील (३०, रा. इंदिरानगर) यांनी त्यांची बजाज दुचाकी (एम.एच.१५ बीएल १२५२) अज्ञात चोरट्यांनी लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार धारणकर करीत आहेत.दुसऱ्या घटनेत म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील बोरगड येथील सप्ततारा सोसायटीत राहणारे काशिनाथ गोसावी (४२) यांच्या अपार्टमेंटच्या वाहनतळातून त्यांच्या मालकीची होंडा ड्रीम युगा दुचाकी (एम.एच.१५ ई.के ८००६) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी त्यांनी म्हसरूळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरीtheftचोरीRobberyचोरी