शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको विभागात  महापालिकेचे सफाई कर्मचारी झाले ‘सह्याजीराव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:10 IST

महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या वेळी येऊन पुन्हा हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सिडको विभागात घडत आहे.

ठळक मुद्देसिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी काही सफाई कर्मचारी हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात काही कर्मचारी महिन्यातील पंधरा-पंधरा दिवस कामावर

नरेंद्र दंडगव्हाळ ।सिडको : महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या वेळी येऊन पुन्हा हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सिडको विभागात घडत आहे.  काही कर्मचारी महिन्यातील पंधरा-पंधरा दिवस कामावर हजर न राहता त्यांच्या स्वाक्षºया परस्पर घेतल्या जात असून, त्यांना संपूर्ण महिन्याचा पगार मिळत आहे. यात अधिकारी व कर्मचाºयांमध्ये आर्थिक तडजोडदेखील होत असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात डेंग्यूसदृश तसेच साथीचे आजार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य विभाग चांगलाच गाजत आहे. आरोग्य विभाग दुसरीकडून बदलून आलेल्या कामगारांना सफाई कामगार म्हणून रुजू करून घेतले जाते; परंतु त्यांना आरोग्य विभागात काम न देता घरपट्टी, जन्म-मृत्यू किंवा इतर विभागात सोयीचे काम देण्यात येत असल्याने सफाई कोणी करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुळात आरोग्य विभागात कामगारांची संख्या कमी असल्याने त्यांना याच विभागात काम करण्याची गरज असताना केवळ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासन अशा कर्मचाºयांवर मेहेरबान होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिडकोतील तुळजाभवानी चौक व परिसरात शंभराहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे उघडकीस आले असून, तुळजाभवानी चौकापाठोपाठ संपूर्ण सिडको भागातच साथीच्या आजाराने अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अशी भयंकर परिस्थिती असताना लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी अवघ्या ११० सफाई कामगारांवर सोपविण्यात आली आहे. यातच आहे ते कर्मचारीदेखील नियमित कामावर येत नसल्याने स्वच्छतेची जबाबदारी कमी कर्मचाºयांवर येत असल्याने त्यांना कामाचा अधिक भार पेलावा लागत आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचारी कमी असताना आहे ते कर्मचारीदेखील नियमित कामावर हजर राहात नसल्याचे दिसून येत आहे. हजेरी मस्टरवर संख्या अधिक दिसत असली तरी प्रत्यक्षात कामावर मात्र कमी कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी सिडकोसह परिसरात डेंग्यू व साथीच्या आजाराने डोके वर काढले होते. परंतु यानंतरही कर्मचारी संख्या वाढविण्यात आलेली तर नाही; परंतु मनपाच्या इतर विभागातून सफाई कामगार म्हणून बदली होऊन आलेल्या कामगारांनादेखील आरोग्य विभागात काम न देता इतर दुसºया विभागात काम करण्यासाठी अधिकाºयांकडूनच सांगण्यात येत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडको विभागात कर्मचारी कमी असून, त्या तुलनेत कामे अधिक आहेत. याबाबत नगरसेवकांनी अनेकवेळा कर्मचाºयांची संख्या वाढविण्याबाबत आवाज उठविला आहे. काही दिवसांपूवी महापौरांनी सिडको प्रभागात घेतलेल्या बैठकीत कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत सांगितले होते. परंतु अद्यापही कर्मचारी संख्या वाढविण्यात आलेली नाही. यातच सिडको विभागातील काही सफाई कर्मचारी हे महिन्यातील पंधरा दिवस कामावर आले नाही तरी त्यांची हजेरी लावण्यात येत असून, यात कर्मचारी व संबंधित अधिकारी यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको