शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी चुंभळे यांना बाजार समितीच्या कामकाजास मनाई

By श्याम बागुल | Updated: August 26, 2019 19:35 IST

बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चुंभळे यांना अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देनिलंबनाची कारणे नोटीस : सहकार खात्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीत कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारणारे सभापती शिवाजी चुंभळे यांना सहकार कायद्यानुसार बाजार समितीच्या सभापतिपदावरून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी बजावली असून, या नोटिसीला चुंभळे यांनी उत्तर देत अंतिम सुनावणी होईपर्यंत बाजार समितीच्या आर्थिक व धोरणात्मक कारभारात चुंभळे यांना मनाई करण्यात आली आहे. सहकार खात्याच्या या कारवाईने चुंभळे यांना भविष्यात बाजार समितीचे दरवाजे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१६ आॅगस्ट रोजी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात ताब्यात घेतले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चुंभळे यांना अटक करण्यात आली होती. चुंभळे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी, त्यांच्या घरझडतीत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य सापडले होते. त्या प्रकरणीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. सभापती शिवाजी चुंभळे हे नाशिक बाजार समितीचे सभापती असून, सदरचे पद हे लोकसेवक या सदरात मोडणारे असल्यामुळे त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची माहिती सहकार विभागाला कळविले होते. त्यानुसार शासन निर्णयानुसार सभापती शिवाजी चुंभळे यांना लाच प्रकरणी झालेली अटक व न्यायालयीन कोठडी पाहता सोमवारी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी महाराष्टÑ कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ चे कलम ४५(१) अन्वये बाजार समितीच्या सभापतिपदावरून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, या नोटिसीवर ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुनावणी ठेवण्यात आली आहे. या नोटिसीच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरुद्ध प्रस्तावित निलंबनाची कायदेशीर कारवाई पूर्ण होवून निकाल होईपर्यंत बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोणत्याही धोरणात्मक निर्णय व आर्थिक व्यवहारासंदर्भातील निर्णय घेण्यात सहभागी करण्यात येऊ नये. या उपरही बाजार समितीच्या कामाकाजात चुंभळे यांना समाविष्ट करून घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सचिवांवर राहील, असेही बलसाने यांनी आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक