शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

चुंचाळे, अंबड भागात अवैध स्टोन क्रशर व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:42 IST

चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत आहे. यामुळे या भागात प्रदूषण वाढले असून, रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

सिडको : चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत आहे. यामुळे या भागात प्रदूषण वाढले असून, रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  यासंदर्भात प्रभाग क्रमांक २७ मधील नगरसेवक व रहिवाशांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अंबड-चुंचाळे भागांतील बेघर घरकुल योजनेतील रहिवासी, व्यावसायिक, उद्योजक व नागरिक या ठिकाणी अनेक वर्षांपासून राहत आहेत. तसेच येथे बांधकाम कारागीर, बिगारी व मजुरी करून मिळेल ते काम करीत आहेत. परंतु गेल्या एक वर्षापासून येथील शासकीयमालकीच्या भूखंडावर काही व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या स्टोन, क्रशरचा अवैध व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणाची हानी होऊन प्रदूषण वाढत आहे त्यातच बारीक गिट्टी, कच, सीमेंट मिश्रित माती उडून मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर खडी व दगड घेऊन जाणारे शेकडो ट्रक येथून रो जा-ये करतात. या अवजड वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. स्टोन क्रशरच्या आवाजामुळे शांततेचा भंग होऊन ध्वनीप्रदूषणदेखील वाढले आहे. या भागातून रोज वाहतूक करणाºया मालट्रकमधील लहान-मोठी खडी, कच रस्त्यावर सांडून अपघात होतात. घरात व दुकानात धुळीचे थर साचतात.  याबाबत तक्रार केल्यास सदर धनदांडगे व्यावसायिक रहिवाशांना धमक्या देतात. त्यामुळे सदर स्टोन व खडी क्रशर व्यवसाय बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक राकेश दोंदे, शशीकला अवचार, बेबीताई शेजवळ, शालू जमदाडे, रंजना माळे, साबेरा सय्यद, ज्योती सोनवणे, कमळ सांळुके, पूनम सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक