शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

चॉपरने वार करुन युवकाचा खून; महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 13:25 IST

महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री उडाल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दंगलखोरांपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देसहा दंगलखोर ताब्याततडीपार गुंडाचा सहभाग

नाशिक : जुने नाशिक परिसरातील वडाळानाका द्वारकेजवळील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दंगल उसळली. यावेळी दंगलखोरांच्या परस्परविरोधी गटांनी एकमेकांवर चॉपर, धारधार सुरा, चाकूसारख्या शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी आकाश संतोष रंजवे (२६) या युवकाला चॉपरचा वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच ठार झाला तर करण लोट या युवकावरही दंगलखोरांनी शस्त्रांनी हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केले असून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच ते सहा संशयित दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे.याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुने नाशिक परिसरात द्वारका व बागवानपुरा या परिसरांच्या मध्यभागी असलेल्या महात्मा फुले पुतळ्याजवळ असलेल्या पोलीस चौकीला लागून महालक्ष्मी चाळ ही वसाहत आहे. या वसाहतीत कामगार वर्ग वास्तव्यास आहे. सोमवारी मध्यरात्री अचानकपणे दोन गट आपआपसांत भिडले. 'तु मेरी पुलीस को टिप क्यु देता हैं' असा जाब विचारत संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी आकाश व करण लोट यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित बेनवालसह सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरिष पवार, मनीष दुलगज, शिवम पवार आदींनी येऊन शिवीगाळ करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी रंजवे यास वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यु झाला तर करण हा गंभीरपणे जखमी झाला. महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री उडाल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दंगलखोरांपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या दंगलखोरांवर खुन, प्राणघातक हल्ला व दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगलीमध्ये सुमारे दहा ते बारा संशयितांचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. फरार समाजकंटकांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनCrime Newsगुन्हेगारी