शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी दिल्लीत झळकलेला साडेतीन शक्तिपीठांचा चित्ररथ वणीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:31 IST

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यावर अधारित चित्ररथ होता

रितेश पारख

वणी (जि. नाशिक) : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित आलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती हा चित्ररथ वणी येथे दाखल झाला आहे. या रथाचे विशेष सादरीकरण १६ मार्च रोजी वणी गावात तर १७ मार्च रोजी आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंग गडावर होत आहे. यापूर्वी कोल्हापूर, तुळजापूर व माहूर या तीन शक्तिपीठांत चित्ररथाचे सादरीकरण झाले. स्थानिक व भाविकांनी चित्ररथ आवर्जून पाहावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यावर अधारित चित्ररथ होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी वणीकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, सर्व नागरिकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वणी येथे चित्ररथ समिती वणीचे दर्शन दायमा, किरण तिवारी, पीयुष भवर, भास्कर पाटील, चेतन कुन्हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयुर जैन, सतीश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांवेरे, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, आबा मोर आदी समिती सदस्य, सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केले आहे.जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक मिळाला. चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी दि. १६ सकाळी ९ वाजता वणी येथे खंडेराव मंदिर परिसरात होणार असून, श्री सप्तशृंगी मातेचे मूळ स्वरूप समजले जाणाऱ्या जगदंबा मातेच्या दरबारात चित्ररथ नेण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdelhiदिल्ली