शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या अंगणात पुन्हा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

नाशिक : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या आणि प्रदीर्घ कालावधीनंतर शाळांच्या परिसरात मुलांचा किलबिलाट ...

नाशिक : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या आणि प्रदीर्घ कालावधीनंतर शाळांच्या परिसरात मुलांचा किलबिलाट ऐकू आला. गेल्या अ्रनेक महिन्यांपासून शाळेत येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना अखेर प्रत्यक्ष नव्या वर्गात बसण्याचा योग आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही सहज दिसत होता. शिक्षकांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत कुठे औक्षण तर कुठे फेटे बांधून स्वागत केले. सजलेल्या शाळा, रांगोळीचे आंगण, पानाफुलांची सजावट, फुग्यांचे प्रवेशद्वार अशा वातावरणात प्राथमिक शाळांमध्ये जणू प्रवेशाचा उत्सवच सुरू होता.

कोरोना संक्रमणाच्या कालावधीपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसात क्लासेसही सुरू झाले होते. आता बुधवारपासून इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गात चिमुकल्यांनी नव्या वर्षात पाऊल ठेवले. कोरोनामुळे गत वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नव्या वर्गात बसण्याचा योग आला नव्हता. परंतु आता शासनाच्या आदेशानंतर इयत्ता पाचवती ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीनंतर शाळेत मुले येणार असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांचे अभिनव पद्धतीने स्वागत केले. सातपूरच्या शाळेत विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केेले. काही शाळांमध्ये मुलांचे औक्षण करण्यात आले तर काही ठिकाण ढोल ताशे देखील लावण्यात आले होते.

विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी केेलल्या उपायोजनांवरून शाळा सुरू झाल्याचा उत्साह शिक्षकांच्या चेहऱ्यावरही दिसत होता. शाळेत आलेले विद्यार्थी देखील आपल्या शिक्षकांना आवर्जून भेटत असल्याचे चित्र दिसत होते. पालकांमध्ये काहीसी चिंता असल्याने त्यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. शाळा सुटेपर्यंत अनेक पालक शाळांमध्ये बसून होते. अर्थात पहिला दिवस असल्याने सध्या तरी शालेय वाहतूक सुरू झालेली नव्हती.

कोरेानोचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी संकट कायम असल्याने शाळांकडून कमालीची दक्षता घेण्यात आली हेाती. शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांचे सॅनिटायझेशन, थर्मल टेंपरेचरने तपासणी करण्यात आली. सर्वच मुलांना रोज बोलविले जाणार नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. एका बाकावर एक याप्रमाणेच विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील पुरेपूर काळजी घेतली असल्याचे दिसून आले. मास्कशिवाय शाळांच्या आवारात कुणालाही परवानगी देण्यात आली नव्हती.