शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चिन्मय उदगीरकर निवडणूक ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:16 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. प्रचाराचा ज्वर वाढत असताना जिल्हा प्रशासनही मतदारांपर्यंत पोहोचून त्यांनी मतदानासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मोहिमेसाठी अभिनेता चिन्मय उदगीरकर मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती करण्यात आलेली आहे. महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉॅइंट लावण्यात आलेले आहेत, तर अलीकडेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून ‘आमच्या सक्षम भवितव्यासाठी मतदान करा’ असे आवाहन करणारे पत्र लिहिण्याचा उपक्रम जिल्हा निवडणूक शाखेने राबविला आहे.याच प्रचारप्रसारच्या मोहिमेतून नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उद््गीरकर यांचे नाव पुढे आले आणि त्यांना निवडणुकीचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर करण्यात आले. जिल्ह्यात सध्या सर्वच मतदारसंघांमध्ये जिल्हा प्रशासन जनजागृती मोहिमेवर भर देत आहे.आता अभिनेता उद्गीरकर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी आवाहन करताना दिसणार आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत अगोदर त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर शहर परिसरातील अनेक ठिकाणी रॅली काढून मतदारांना आवाहन केले जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Chinmay udagirkarचिन्मय उद्गगिरकरElectionनिवडणूक