सावंतांच्या चित्रांवर चिनी चित्रकाराचा आक्षेपकॉपीचा दावा : सोशल मीडियावर पोस्ट व्हायरलनाशिक : गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेची पारितोषिके पटकावणारे येथील प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या चित्रांवर चीनमधील प्रख्यात चित्रकार चीनचुंग वेई यांनी आक्षेप घेतला असून, सावंत यांनी आपल्या चित्राची कॉपी केल्याचा दावा फेसबुकवर केला आहे. त्यांची पोस्ट फेसबुक, व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाली असून, या प्रकाराने शहरातील कलाप्रेमींना धक्का बसला आहे. दरम्यान, सावंत बंधूंनी मात्र हा आरोप फेटाळून लावत हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हटले आहे. राजेश व प्रफुल्ल सावंत यांची चित्रे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असून, त्यांनी अनेक मानाची पारितोषिकेही पटकावली आहेत. विविध देशांत त्यांना प्रदर्शने व कलाविष्कारासाठी सन्मानाने निमंत्रितही करण्यात आले आहे. आतादेखील ते युरोपातील अल्बानिया देशाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत; मात्र चीनमधील प्रख्यात चित्रकार चीनचुंग वेई यांनी फेसबुकवर प्रफुल्ल सावंत यांचे ‘इस्तंबूल अॅट इव्हिनिंग’ हे चित्र व आपले चित्र अपलोड करीत ‘तुम्ही माझे चित्र केवळ उलट (मिरर) करू नका, तर त्यात काही बदल करा आणि त्यानंतर त्याला स्वत:चा कलाविष्कार म्हणा’ अशा शब्दांत सावंत यांच्यावर आक्षेप घेतला.
सावंतांच्या चित्रांवर चिनी चित्रकाराचा आक्षेप
By admin | Updated: November 19, 2015 23:01 IST