नाशिक : पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त राष्ट्रीय बालदिनाच्या औपचारिकेतवर चिंचखेड (दिंडोरी) येथून जिल्'ातील अंगणवाड्यांमध्ये १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या बालस्वच्छता अभियानाचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश डोखळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालदिनापासून शाळेत व अंगणवाड्यांमध्ये बालस्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार या बालस्वच्छता अभियानाचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे यांच्या दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतून करण्यात आला. यावेळी स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश देणारी शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व अधिकाऱ्यांनी स्वच्छता ठेवण्याबाबत शपथ घेतली. या अभियानाप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे, पंचायत समिती सभापती अलका चौधरी, उपसभापती छायाताई डोखळे, पंचायत समिती सदस्य सुनील मातेरे, चिंचखेडच्या सरपंच हौशाबाई माळेकर, उपसरपंच दादासाहेब पाटील, कादवा कारखान्याचे संचालक सुरेश डोखळे, गटविस्तार अधिकारी शेवाळे, टी. के. संधान, सूर्यजोशी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चिंचखेडला बालस्वच्छता अभियानाचा शुभारंभ सभापती शोभा डोखळेंची उपस्थिती
By admin | Updated: November 15, 2014 00:25 IST