शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

By admin | Updated: October 14, 2015 23:34 IST

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

हल्लीची मुलं वाचतच नाही...’ अशी तक्रार घराघरातून ऐकू येते; पण खरोखर मुलांनी वाचावे, यासाठी मात्र कोणी पुढाकार घेत नाही. वाचनाचे अफाट वेड असलेल्या स्वाती गोरवाडकर यांचे मात्र तसे नाही. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या जिद्दीने काम करीत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेत सहभागी झाल्यानंतर असा उपक्रम लहान मुलांसाठीही राबवण्याची कल्पना गोरवाडकर यांच्या डोक्यात आली. हा विचार त्यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांच्याकडे बोलून दाखवला आणि त्यातूनच नवी योजना जन्माला आली, तिचं नाव ‘माझं ग्रंथालय - बालविभाग’! नाशिकमध्ये खास लहान मुलांसाठी वर्षभर चालणारा एकही उपक्रम नाही, घरात टीव्ही, इंटरनेटमुळे मुले वाचत नाहीत, हे लक्षात घेऊन गोरवाडकर यांनी ११० ग्रंथपेट्या तयार केल्या. प्रत्येक पेटीत लहान मुलांना भावतील अशी अकबर-बिरबल, पंचतंत्र, जातककथा यांसारखी १५ मराठी आणि १० इंग्रजी अशी मिळून २५ पुस्तके ठेवली. योजनेच्या सभासदांनी दर दीड महिन्याने एकत्र यायचे आणि पेटी बदलून घ्यायची. या दीड महिन्यात मुलांनी त्या पेटीतील जमतील तेवढी पुस्तके वाचायची, असे या उपक्रमाचे स्वरूप. वाचनालयातून एका वेळी एकच पुस्तक मिळते; पण अशी एकदम २५ पुस्तके हाती आल्यानंतर मुलांना हवी ती पुस्तके वाचण्याचा पर्याय मिळतो आणि त्यातून त्यांची वाचनाची आवडही वाढते, असे गोरवाडकर सांगतात. मूळ धुळ्याच्या असलेल्या स्वाती यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. त्यांना आई-वडिलांकडून हा वारसा मिळाला. वाचनातून मिळणाऱ्या आनंदाला हल्लीची मुले पारखी झाली आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सध्या या उपक्रमाचे ११० सभासद आहेत. दर दीड महिन्याने पुस्तके बदलण्यासाठी एकत्र जमणाऱ्या मुलांना निरनिराळ्या कलांचा परिचय करून द्यावा, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. मग त्यातूनच शाडू मातीच्या गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवणे, विनातेल व विनागॅस स्वयंपाक करणे अशा निरनिराळ्या विषयांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात झाली. आता नववी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही ग्रंथयोजना सुरू करण्याचा गोरवाडकर यांना मनोदय आहे.त्या सांगतात, पुस्तकांच्या वाचनातून मिळणाऱ्या आनंदाची दुसऱ्या कशाशी तुलनाच केली जाऊ शकत नाही. टीव्ही, इंटरनेटमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेनासा झाला आहे. बरीच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने त्यांना मराठीतले बरेचसे शब्द माहीतच नसतात. त्यामुळे काही मुले ‘अडीच’च्या ऐवजी चक्क ‘साडेदोन’ म्हणतात. अशा मुलांची भाषा सुधारण्यासाठी, त्यांच्यातली सर्जनशीलता, कल्पकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ही फक्त पुस्तक देवाणघेवाण नाही, तर देशाचे उद्याचे नागरिक घडवण्याचा छोटासा प्रयत्न आहे... गोरवाडकर यांची ही धडपड म्हणूनच कौतुकास्पद ठरते !