शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत मोकाट जनावरांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:13 IST

नाशिक : मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात सात वर्षीय शाळकरी चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़४) सकाळी सिडकोतील साईबाबानगरमध्ये घडली़ महेश पवार (७, रा. साईबाबानगर, सिडको, नाशिक) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जखमी महेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे़ दरम्यान, या परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळची घटना

नाशिक : मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात सात वर्षीय शाळकरी चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़४) सकाळी सिडकोतील साईबाबानगरमध्ये घडली़ महेश पवार (७, रा. साईबाबानगर, सिडको, नाशिक) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जखमी महेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे़ दरम्यान, या परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजेच्या सुमारास महेश आपल्या आईसोबत जात होत़ यावेळी साईबाबानगरमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या मोकाट जनावरांपैकी एकाने जनावराने महेश यास शिंगावर उचलून घेत जमिनीवर आदळले़ यामध्ये महेशचे डोके, छाती व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे़ या मोकाट जनावरांच्या तावडीतून सुटका करीत महेशला त्याच्या आईने नागरिकांच्या मदतीने जवळील रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़

या परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील रहिवाशांनी ४ डिसेंबर रोजी महापालिका प्रशासनास दिले होते़ मात्र, याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ दरम्यान, सिडको व पंचवटी, तसेच शहरातील विविध भागांत असलेल्या मोकाट जनावरांचा महापालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़डोक्यास गंभीर स्वरुपाचा मार मोकाट जनावरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेशला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्याच्या डोक्यास गंभीर स्वरुपाचा मार लागला असून ७२ तास त्यास परिक्षणाखाली ठेवावे लागणार आहे़डॉ़ वैभव महाले, संचालक कल्पतरू हॉस्पिटल़ नाशिक़

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक