इंदिरानगर : घरात झोळीत झोपवलेल्या बालिकेचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना दुपारी इंदिरानगरच्या ज्ञानेश्वरनगर येथे घडली़लक्ष्मी रमेश पवार (दीड वर्ष) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे़ ज्ञानेश्वरनगरच्या गणराज अपार्टमेंट येथील आऊट हाऊसमध्ये राहणारे रमेश पवार हे वॉचमन म्हणून सदर ठिकाणी काम करतात़ दुपारी त्यांच्या दीड वर्ष वयाच्या मुलीला घरातील झोळीत झोपवण्यात आले होते़ मुलीची आई घरातील कामे, तसेच धुणे-भांडे उरकून मुलीला घ्यायला गेली असता मुलगी मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)
झोळीत गुदमरून बालिकेचा मृत्यू
By admin | Updated: July 18, 2014 00:40 IST