शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अभोण्यात कोरोनाबाधित पित्याच्या मृतदेहावर मुलांनीच केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:38 IST

अभोणा : येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये बाधित चिंतामण दामोदर कामळस्कर (७४) यांचा सोमवारी (दि. २१) सकाळी मृत्यू झाला. पालिका प्रशासनास रुग्णाच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्याचे निर्देश देत मदत मागितली. मात्र ग्रामपालिकेच्या ढिसाळ व वेळखाऊ दुर्लक्षामुळे मृतदेह दिवसभर रुग्णालयात पडून होता. प्रशासनाकडून दिवसभर टोलवाटोलवी करण्यापलीकडे कोणतेही सहकार्य न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या मृताच्या मुलांनीच पीपीई किट घालून मृतदेह खासगी ट्रॅक्टरद्वारे गिरणातीरी नेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामपंचायतीतर्फे एक दिवस जनता कर्फ्यू

लोकमत न्यूज नेटवर्कअभोणा : येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये बाधित चिंतामण दामोदर कामळस्कर (७४) यांचा सोमवारी (दि. २१) सकाळी मृत्यू झाला. पालिका प्रशासनास रुग्णाच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडण्याचे निर्देश देत मदत मागितली. मात्र ग्रामपालिकेच्या ढिसाळ व वेळखाऊ दुर्लक्षामुळे मृतदेह दिवसभर रुग्णालयात पडून होता. प्रशासनाकडून दिवसभर टोलवाटोलवी करण्यापलीकडे कोणतेही सहकार्य न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या मृताच्या मुलांनीच पीपीई किट घालून मृतदेह खासगी ट्रॅक्टरद्वारे गिरणातीरी नेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.कळवण, सुरगाणा व पेठ या तीन तालुक्यांतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या पन्नासपेक्षा अधिक रुग्ण येथे उपचार घेत आहेत. आजच्या या प्रकाराने येथे उपचार घेणारे रुग्णही भांबावले आहेत. ३ सप्टेंबरला जिल्हा उपरुग्णालयाचे नोडल आॅफिसर यांनी ग्रामपालिका प्रशासनास कोविड सेंटरमधील मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शक परिपत्रक पाठविलेले आहे. मात्र, त्यानुसार सहकार्य न करता दिवसभर उडवाउडवीची उत्तरे देत मृताच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याच्या या माणूसकीशून्य वर्तणुकीचा सर्वत्र निषेध होत आहे. जिल्हा प्रशासनाने येथे स्वतंत्र विद्युतदाहिनी व रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपालिकेचे माजी सदस्य सुनील खैरनार यांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आठवडे बाजार तसेच सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून, एक दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाचे अजब उत्तर; विमा कवच नसल्याचे कारणग्रामपंचायतीचे प्रशासक कांतिलाल चव्हाण यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असता आम्हाला विमाकवच नाही. आमचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न करीत ट्रॅक्टरचालकासह कर्मचाऱ्यांनी येण्यास नकार दिल्याने आमचे हात बांधले गेले, तर कर्मचाºयांसाठी मागविलेले पीपीई किट रात्री उशिरा मिळाल्याचे ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू