निफाड : तालुक्यातील शिवरे येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळी जीपने पाचवर्षीय बालकास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शिवरे येथे बुधवारी (दि. १३) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पाचवर्षीय बालक विकास छगन पवार आपल्या आजीबरोबर इतर भावंडांबरोबर स्टॅण्डवर आले होते. नांदूरमधमेश्वरकडे जाणाऱ्या (एमएच १५ इ ४३२३) या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने विकासला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. (वार्ताहर)
शिवरेत अपघातात बालक ठार
By admin | Updated: July 15, 2016 01:35 IST