सटाणा : शहरालगत सुकडनाला येथील झोपडपट्टी परिसरात पाचवर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या युवकावर सटाणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सटाणा-ताहाराबाद रस्त्यालगत असलेल्या सुकडनाला परिसरात रविवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोपान सूर्या मोरे (२०) या युवकाने पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत मुलाच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संबधित संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव करीत आहेत.लहान बालकावर झालेल्या अनैसर्गिक कृत्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांतर्फे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, संबंधिताचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
सटाण्यात बालकावर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:33 IST
सटाणा : शहरालगत सुकडनाला येथील झोपडपट्टी परिसरात पाचवर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या युवकावर सटाणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा ...
सटाण्यात बालकावर अत्याचार
ठळक मुद्देयुवकावर सटाणा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल