शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नाभिक समाजातर्फे निषेध ; तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:13 IST

नाभिक समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली.

ठळक मुद्दे नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दौंड तालुक्यात नाभिक समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य हाताच्या दंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या

नाशिक : नाभिक समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली.  मुख्यमंत्र्यांनी दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी नाभिक समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याविरुद्ध नाभिक समाजात तीव्र संतापाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजाकडून होत असून, या वक्तव्याच्या विरोधात नाशिकच्या सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली.  यावेळी सर्वांनी हाताच्या दंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतानाच त्यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी जोडे मारले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाभिक समाजाविषयी जे काही मत मांडले आहे, तशी घटना कोणत्याही सलूनमध्ये घडलेली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी तसे सिद्ध केल्यास समस्त नाभिक समाजाकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल, असे आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे.  या आंदोलनात दिलीप तुपे, नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, दिलीप जाधव, अरुण सैंदाणे, नारायण वाघ, सुभाष बिडवई, संजय वाघ, तुषार बिडवे, विलास भदाणे, सुरेश बोरसे, अशोक सोनवणे आदी समाजबांधव सहभागी झाले होते. शांतताप्रिय समाज नाभिक समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, विश्वासू समाज म्हणून ओळखला जातो. उदरनिर्वाहासाठी हजामतीचा व्यवसाय करतो. नेहमी हत्यार जवळ असतानाही त्याने कुणाशीही द्वेषभावनेने हत्याराचा दुरुपयोग केलेला नाही. अशा इमानदार समाजाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले व समाजाचा अवमान केला असून, त्यांनी तत्काळ समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीStrikeसंप