शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विखे, क्षीरसागर यांना मंत्रीपदे देणे मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:16 IST

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय भ्रष्टाचारमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप विखे, क्षीरसागर यांची मंत्रीपदे घटना बाह्य असल्याचा दावा

नाशिक : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते. काग्रेससोडून भाजपाते गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे ही घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले असून या संदर्भात  उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना  काँग्रेसतून भाजापात आलेले  विखे  व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रीपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार असून हा राजकीय भ्रष्टाचार खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.  याप्रकरणी सोमवारी (दि.२४) उच्च न्यायालायत सुनावणी होणार असून त्यानंतर हे प्रकरण अधिक स्पष्ट होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्ते केले.दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्शभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीविषयी चर्चा सुरु असून वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याविषयी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हा राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक हेमलता पाटील. डॉ. प्रतापराव वाघ आदि उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील